esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 मे 2021

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 मे 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : चैत्र कृष्ण ९, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय रात्री २.५०, चंद्रास्त दुपारी १.४८, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ६.५६, भारतीय सौर वैशाख १५ शके १९४३.

दिनविशेष -

१९८९ : प्रख्यात उद्योगपती नवल एच. टाटा यांचे निधन. त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविले होते.

१९९७ : जयदीप अमरे या साडेपाच वर्षीय बालकाने मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची पहिलीच घटना आहे.

२००१ : भारताच्या सरला शेट्टीने आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ८२.५ किलो वजनी गटात स्क्वाट प्रकारात २५० किलोचा विक्रम करून सुवर्णपदक मिळविले.

२००४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शिक्षण संस्थांत मराठी भाषा सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.

दिनमान -

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.

वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : जबाबदारी येवून पडण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : वैवाहिक सौख्य लाभेल. भागीदारीतील महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

कन्या : विरोधकांवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. अनेकांच्या गाठीभेटी होतील.

वृश्‍चिक : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास वाढेल.

धनु : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. विरोधकांवर मात कराल.

मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : मानसिक उत्साह वाढेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.