esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 02 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 05 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी सिंह/कन्या, चंद्रोदय सकाळी ६.०६, चंद्रास्त सायंकाळी ५.४९, चतुर्दशी श्राद्ध, शस्त्रादिहत पितृ श्राद्ध, अमावास्या प्रारंभ सायंकाळी ७. ०५, भारतीय सौर आश्विन १३ शके १९४३.

दिनविशेष -

जागतिक शिक्षकदिन ( युनेस्को)

१८७८ : विजापूरनजीक वसलेल्या ‘तिकोटे’ गावचे विष्णुपंत मोरेश्‍वर छत्रे यांनी स्थापन केलेल्या सर्कशीचा पहिला प्रयोग कुरुंदवाडला झाला. ही भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिली सर्कस होय.

१८९० : तत्त्वज्ञ किशोरीलाल घनश्‍यामलाल मशरूवाला यांचा जन्म. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ‘हरिजन’चे संपादक होते.

१९५५ : पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‌घाटन. भारताच्या आधुनिकीकरणात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे आहे.

१९७४ : भारताचे माजी संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांचे निधन.

१९९० : आधुनिक हिंदी कवी, नाटककार व समीक्षक राजकुमार वर्मा यांचे निधन. रशियन सरकारच्या निमंत्रणावरून मॉस्को विद्यापीठात त्यांनी एक वर्ष हिंदीचे अध्यापन केले.

१९९१ : ‘इंडियन एक्‍स्प्रेस’ वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्यचळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोएंका यांचे निधन.

दिनमान -

मेष : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लावाल. बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिवस अनुकूल.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस अनुकूल आहे. शत्रुपीडा नाही.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

कन्या : मतांविषयी आग्रही राहाल. प्रवास सुखकर

होतील.

तूळ : काहींना कामाचा ताण जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

धनू : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचे कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

मीन : वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

loading image
go to top