esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 05 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 05 सप्टेंबर

पंचांग -
शनिवार - भाद्रपद कृ.3, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा.8.52, चंद्रास्त स. 8.45, भारतीय सौर 14, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 05 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार - भाद्रपद कृ.3, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.46, चंद्रोदय रा.8.52, चंद्रास्त स. 8.45, भारतीय सौर 14, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
शिक्षक दिन
१८८८ - जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. त्यांच्या गौरवार्थ त्यांचा जन्मदिन हा ‘शिक्षक दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यांना १९५४ मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
१८९५ - भाषा संशोधक व लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म. त्यांनी संपादिलेल्या विविध ग्रंथांत रघुनाथपंडितकृत ‘दमयंती स्वयंवर’, ‘मुक्तेश्वरकृत महाभारताचे आदिपर्व (खंड १ ते ४)’ हे उल्लेखनीय होत. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे आत्मचरित्र त्यांनी संपादिले. ‘द प्रिटिंग प्रेस इन इंडिया’, ‘गोवा री डिस्कव्हर्ड’, ‘द गोवा इंक्रिझिशन’, ‘ग्रांथिक मराठी भाषा आणि कोकणी बोली’ हे त्यांचे काही ग्रंथ होत. 
१९०४ -  संत वाङ्मयाचे गाढे उपासक व संशोधक डॉ. भा. पं. तथा बाबुरावजी बहिरट यांचा जन्म. त्यांचा ‘फिलॉसॉफी ऑफ ज्ञानदेव’ हा इंग्रजी ग्रंथ संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातही मान्य पावला.
१९१८ - भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी कापड गिरण्या, जलविद्युत प्रकल्प उभारणारे उद्योगपती, सर रतनजी जमशेटजी टाटा यांचे निधन. त्यांच्या नावे उभारलेल्या सर रतन टाटा ट्रस्ट न्यासाला त्यांनी सर्व वैयक्तिक संपत्ती दिली. 
१९२० - बालसाहित्यिका लीलावती भागवत यांचा जन्म. बालसाहित्याचे कथा, कादंबरी, चरित्र, नाटुकली इ. वाङ्‌मय प्रकार त्यांनी समृद्ध केले. सहजसुंदर ओघवती भाषा, चित्रमय वर्णन, बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. नॅशनल बुक ट्रस्टने ‘स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. बालसाहित्याच्या संदर्भात साडेचारशे पृष्ठांचा ‘मराठी बालसाहित्य - प्रवाह आणि स्वरूप’ हा ग्रंथ लिहिला. 
१९७८ - मराठी साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार रघुनाथ रामचंद्र ऊर्फ रॉय किणीकर यांचे निधन. ते मुंबई आकाशवाणीवरील ‘वाऱ्यावरची वरात’ व ‘मेघदूत’ या ध्वनिक्षेपित झालेल्या श्राव्य नियतकालिकांचे निर्माते व लेखक होते. ‘पन्ना’ (हिंदी), ‘भक्त पुंडलिक’, ‘शिर्डीचे साईबाबा’, ‘झाला महार पंढरीनाथ’ इ. चित्रपटांचे कथा-पटकथा, संवादलेखन त्यांनी केले. त्यांच्या ‘ये गं ये गं विठाबाई’ या नाटकास महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक मिळाले.
१९९२ - ज्येष्ठ उद्योगपती अतुर संगतानी यांचे निधन.
१९९५ - हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार सलील चौधरी यांचे निधन. आजा रे परदेसी, दिल तडप तडप के (मधुमती), जिंदगी ख्वाब है, जागो मोहन प्यारे (जागते रहो), ओ सजना बरखा बहार (परख), ए मेरे प्यारे वतन (काबुलीवाला), कही दूर जब दिन ढल जाये (आनंद), रजनीगंधा फूल तुम्हारे (रजनीगंधा) इ. त्यांची गीते अविस्मरणीय आहेत.
१९९६ - नामवंत मल्याळी कवयित्री बालमणी अम्मा यांची त्यांच्या ‘निवेद्यम’ या काव्यसंग्रहाबद्दल पाचव्या ‘सरस्वती सम्मान’ या पुरस्कारासाठी निवड.
१९९७ - नोबेल पारितोषिक विजेत्या, शांततेचे प्रतीक व मानवतेचे आशास्थान असलेल्या थोर समाजसेविका मदर तेरेसा यांचे निधन. त्यांना ‘भारतरत्न’ या सन्मानाने गौरविण्यात आले.
२००० - सलामीचे फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरीने आपला ठसा उमटविलेले वेस्ट इंडीजचे माजी कसोटी क्रिकेटपटू रॉय फ्रेड्रिक्‍स यांचे लंडन येथे निधन.
२००० - गेली सुमारे पाच दशके उत्तमोत्तम व दर्जेदार चित्रपट बनविणारे ज्येष्ठ दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
२००२ - ज्येष्ठ तत्त्वचिंतक, महाभारताचे व्यासंगी आणि संतकवी श्री दासगणू महाराजांचे उत्तराधिकारी प्राचार्य अनंतराव दामोदर आठवले तथा स्वामी वरदानंद भारती निधन.
२००४ - शहीद भगतसिंग यांचे बंधू स्वातंत्र्यसैनिक आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री कुलतारसिंग यांचे निधन.

दिनमान -
मेष  : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ : अपेक्षित गाठीभेटी होतील. महत्त्वाच्या कामांचे नियोजन करू शकाल. 
मिथुन : सार्वजनिक, राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 
कर्क  : तुमच्या क्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. गुरूकृपा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल.
सिंह : दैनंदिन कामात अडचणी जाणवतील. वादविवाद टाळावेत. चिडचिडेपणा जाणवेल.
कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल. 
तुळ : प्रवास शक्यतो टाळावेत. सहकार्याची अपेक्षा नको. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
वृश्‍चिक  : नवीन परिचय होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. 
धनु : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. उत्साह वाढेल. आत्मविश्‍वास वाढेल.
मकर  : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. 
कुंभ : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. 
मीन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

Edited By - Prashant Patil