आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 06 डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

पंचांग -
रविवार - कार्तिक कृष्ण ६, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री ११.१९, चंद्रास्त सकाळी ११.४४, भारतीय सौर मार्गशीर्ष १५ शके १९४२.

पंचांग -
रविवार - कार्तिक कृष्ण ६, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ६.५५, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय रात्री ११.१९, चंद्रास्त सकाळी ११.४४, भारतीय सौर मार्गशीर्ष १५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९५६ : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन. गाढा व्यासंग, मूलभूत व स्पष्ट विचार, कृतिशील लढाऊ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांनी मोठी चळवळ उभारली. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना, मिलिंद व सिद्धार्थ या शिक्षण प्रकल्पांची उभारणी, केंद्रीय कायदेमंत्री या नात्याने भारताच्या राज्यघटनेचा मसुदा, लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात जाहीर प्रवेश, अशा महत्त्वपूर्ण प्रसंगांच्या मालिकेमुळे त्यांचे सर्वच आयुष्य मोठे घटनापूर्ण होते.
१९७१ : भूवैज्ञानिक, मराठी विश्वकोशाच्या विज्ञान कक्षेचे प्रभारी विभाग संपादक, शिक्षक व प्रशासक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. त्यांनी पश्‍चिम भारतातील भूविज्ञानाच्या अध्ययनाचा पाया घातला. १९३८-५८ दरम्यान ते ‘सृष्टिज्ञान’ या विज्ञानविषयक मासिकाचे संपादक आणि सल्लागार होते.
१९७६ : बेचाळीसच्या लढ्यातील पत्री सरकारचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे निधन.
१९९३ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलिजीचे शास्त्रज्ञ एम. के. टंडन यांना हवामानशास्त्रासाठीचा सातवा सार्क (दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषद) विभागीय पुरस्कार प्रदान.
२००० : ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

दिनमान -
मेष :
आरोग्य उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
वृषभ : आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
कर्क : तुमचे मते इतरांना पटवून द्याल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
सिंह : प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्यता. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कन्या : संततिसौख्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
तूळ : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
वृश्‍चिक : प्रवासाचे योग येतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.
धनू : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मकर : वैवाहिक सौख्य लाभेल. काहींना बढतीची शक्‍यता आहे.
कुंभ : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होईल.
मीन : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील. प्रवासाचे योग येतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 06th December 2020