esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०७ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - आषाढ कृ. २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. ९.१५, चंद्रास्त स. ६.५६, भारतीय सौर १६, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०७ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - आषाढ कृ. २, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. ९.१५, चंद्रास्त स. ६.५६, भारतीय सौर १६, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
महाकवी कालिदास दिन
१८५४ - कावसजी दादर यांनी मुंबईत कापडगिरणी सुरू केली. मुंबईतील ही पहिलीच कापडगिरणी.
१८९६ - मुंबईच्या फोर्ट विभागातील ‘एस्प्लनेड मॅन्शन’ या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते व लुई या ल्युनियर बंधूंनी भारतातील पहिल्या चित्रपटाचे दर्शन घडविले.
१९१० - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळ ही संस्था स्थापन केली. 
१९९६ - भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीच्या संदर्भात काही प्रस्ताव समोर येतील. परंतु निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत. वृषभ : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढणार आहे.
मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. गरजेपेक्षा वस्तूंचा अधिक साठा करू नये. 
कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. संततिसौख्य लाभेल.
सिंह : काहींना मानसिक अस्वास्थ्य लाभेल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. 
कन्या : आरोग्य चांगले राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. 
तूळ : व्यवसायातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे भासेल. काहींना सुसंधी लाभेल.
वृश्‍चिक : महत्त्वाच्या कामामध्ये संयमाने कार्यरत राहावे. संततिसौख्य लाभेल.
धनू : वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. 
मकर : कर्मचारी वर्गाकडे लक्ष द्याल. कला क्षेत्रातील व्यक्तींना यश लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात कामे मार्गी लावू शकाल. प्रवास टाळावेत.
मीन : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. काहींना गुरुकृपा लाभेल.