आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 07 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

पंचांग -
बुधवार - अधिक आश्विन कृष्ण ५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, चंद्रोदय रात्री १०.०४, चंद्रास्त सकाळी १०.४४, भारतीय सौर १५ शके १९४२.

पंचांग -
बुधवार - अधिक आश्विन कृष्ण ५, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, चंद्रोदय रात्री १०.०४, चंद्रास्त सकाळी १०.४४, भारतीय सौर १५ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६६ - मराठी काव्याचे प्रवर्तक कवी केशवसुत यांचा जन्म. त्यांचे नाव कृष्णाजी केशव दामले. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांचा एकही काव्यसंग्रह प्रकाशित झाला नाही. ‘केशवसुतांची कविता’ हा त्यांचा काव्यसंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत.
१९०५ - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी पुण्यात विलायती कपड्यांची जाहीर होळी करुन क्रांतिकार्याची सुरवात केली.
१९२२ - क्रिकेट कसोटीमधील नामवंत यष्टीरक्षक पद्मनाभ गोविंद ऊर्फ नाना जोशी यांचा जन्म. रणजी सामन्यात ते महाराष्ट्राचे कर्णधार होते. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्यांनी रमाकांत देसाई यांच्याबरोबर नवव्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली.
२००० - साहित्य, संस्कृती व संशोधन या क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या प्रतिष्ठेच्या गौरव वृत्ती पुरस्कारासाठी डॉ. यु. म. पठाण यांची निवड.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे.
वृषभ : इतरांवर प्रभाव पडेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. प्रवासाचे योग येतील.
मिथुन : अकारण वेळ वाया जाईल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कर्क : नवनवीन संधी चालून येतील. संततीच्या तक्रारी जाणवतील. विविध लाभ होतील.
सिंह :  शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. 
कन्या : काहींना गुरूकृपा लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मते इतरांना पटवून द्याल.
तुळ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे. अकारण चिंता लागून राहील. 
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
मकर : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. 
कुंभ : कौटुंबिक जीवनात अडचणी जाणवतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन :  तुमची मते इतरांना पटवून द्याल. नवनवीन संधी चालून येतील.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 07th october 2020