esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - कार्तिक कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.१३, चंद्रास्त दुपारी १.०९, भारतीय सौर मार्गशीर्ष १७ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - कार्तिक कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या, सूर्योदय ६.५६ सूर्यास्त ५.५७, चंद्रोदय रात्री १.१३, चंद्रास्त दुपारी १.०९, भारतीय सौर मार्गशीर्ष १७ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९७ - प्रसिद्ध हिंदी कवी ‘नवीन’ (बाळकृष्ण शर्मा) यांचा जन्म. हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. १९५५ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रभाषा आयोगाचे ते  सदस्य होते.
१९०० - जागतिक कीर्तीचे नृत्यकलाकार उदय शंकर यांचा जन्म.  भारतात अलमोडा येथे त्यांनी ‘इंडिया कल्चर सेंटर’ची स्थापना केली.  सरकारने त्यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरविले.
१९९३- जुन्या पिढीतील ख्यातनाम चित्रपट व नाट्य अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
१९९४ - भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष प्रा. सतीश धवन आणि प्रा. यू. आर. राव यांना ‘आर्यभट्ट’ पुरस्कार जाहीर.
१९९६ - श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीस सातशे वर्षे पूर्ण.
१९९७ - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष बाबूमियाँ बॅंडवाले यांचे निधन.
१९९८ - ढोलकीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे ‘ढोलकी सम्राट’ यासिन म्हाब्री यांचे निधन.
१९९९ - टाटा केमिकल्स आणि टाटा टी या कंपन्यांचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दरबारी सेठ यांचे निधन.

दिनमान -
मेष :
कला क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : शासकीय कामात यश लाभेल.आरोग्य उत्तम राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मिथुन : मानसिक अस्वस्थता लाभेल. थोरामोठ्यांचे परिचय होतील.
कर्क : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.
सिंह : काहींच्या जीवनात वैचारिक प्रगती होईल. शासकीय कामात यश लाभेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.
तुळ : नवीन परिचय होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. प्रवासाचे योग येतील.
वृश्‍चिक : व्यवसायात वाढ करू शकाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
धनु : तुमचे निर्णय अचूक ठरतील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : प्रवासात काळजी घ्यावी. शत्रुपिडा नाही.
कुंभ : बौद्धिक क्षेत्रातील व्यक्‍तींन विशेष यश लाभेल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

Edited By - Prashant Patil

loading image