esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, चंद्रोदय रात्री १०.५२, चंद्रास्त सकाळी ११.३७, भारतीय सौर १६ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 08 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - अधिक आश्विन कृष्ण ६, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.२७, सूर्यास्त ६.१६, चंद्रोदय रात्री १०.५२, चंद्रास्त सकाळी ११.३७, भारतीय सौर १६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
भारतीय वायुसेना दिन  

१८४४ : काँग्रेसचे एक संस्थापक, नामवंत कायदेपंडित बॅ. बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म.
१८८८ : कवी, संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन. ‘राजा शिवाजी’ या काव्याने त्यांचे नाव विशेष गाजले. ‘राजाराम महाराज छत्रपती’,  ‘मन नावाची कविता’ ही त्यांची इतर काव्यरचना. 
१८९१ : किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक, संपादक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. १९२० मध्ये त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातूनच किर्लोस्कर, स्त्री, मनोहर या मासिकांचे संपादन व प्रकाशन करण्यास त्यांनी प्रारंभ केला. ‘शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन म्हणजे उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना होय.
१९७९ : ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान असणारे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन.

दिनमान -
मेष :
तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. 
वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. शासकीय कामे मार्गी लावू शकाल. 
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. निर्णय अचूक ठरतील.
कर्क : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. काहींना नैराश्य जाणवेल. 
सिंह :  प्रियजनांच्या गाठीभेटी पडतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. 
कन्या : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून हाती घेतलेल्या कामात सुयश मिळवाल. 
तुळ :  काहींना गुरूकृपा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवास सुखकर होतील.
वृश्‍चिक : काहींना नैराश्य जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. 
धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. 
मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. 
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. संततीसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मीन :  नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil