esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 08 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद कृ.6, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.43, चंद्रोदय रा.10.39, चंद्रास्त स. 11.10, भारतीय सौर 13, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 08 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - भाद्रपद कृ.6, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.23, सूर्यास्त 6.43, चंद्रोदय रा.10.39, चंद्रास्त स. 11.10, भारतीय सौर 13, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
साक्षरता दिन (युनेस्को) 

१९०५ - ज्येष्ठ पत्रकार बलवंत श्रीपत ऊर्फ बाळासाहेब रूद्र यांचा जन्म. ‘ज्ञानप्रकाश’, ‘लोकशक्ती’, ‘सकाळ’ दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली.
१९३० - शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आणि ‘शारदा’ संस्कृत पत्रिकेचे संपादक पं. वसंतराव गाडगीळ यांचा जन्म.  इंटरनेटवरून प्रसिद्ध होणारे ‘शारदा’ हे पहिले संस्कृत ‘ई-नियतकालिक’ आहे. 
१९३३ - चिरतरुण स्वरातून संगीतरसिकांना गेली अनेक वर्षे मंत्रमुग्ध करणाऱ्या पार्श्वगायिका आशा भोसले यांचा जन्म. त्यांनी देशातील जवळजवळ सर्व भाषांतून तसेच इंग्रजी आणि रशियन भाषेतूनही गाणी गायली आहेत.  
१९६० - खासदार फिरोझ गांधी यांचे निधन.
१९६१ - ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि नगर जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षणाचे जनक डॉ. भा. पां. हिवाळे यांचे निधन. त्यांच्या प्रयत्नांमुळे नगर हे उच्च शिक्षणाचे व वैज्ञानिक संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र झाले.
१९९७ - पद्मश्री सन्मान, तसेच धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. विश्वनाथ साळस्कर यांचे निधन.
१९९७ - भारतातील पहिल्या महिला जैवरसायनशास्त्रज्ञ व आहारशास्त्रातील प्रख्यात तज्ज्ञ डॉ. श्रीमती कमला सोहोनी यांचे निधन.

दिनमान -
मेष  :
मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. धनलाभाची शक्यता. 
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. इतरांवर प्रभाव पडेल. मते इतरांना पटवून द्याल.
मिथुन : वादविवाद टाळावेत. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क  :  राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. 
सिंह : महत्त्वााची कामे पार पडतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामात अडचणी जाणवतील.
तुळ : वादविवाद टाळावेत. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. मनोरंजनाकडे कल राहील. 
धनु : तुमच्या कार्यक्षेत्रात हाताखालील व्यक्तींच्या सहकार्याची अपेक्षा नको. 
मकर  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. 
कुंभ : नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. तुमच्या कर्तृत्त्वाला वाव मिळेल. 
मीन : विरोधकांवर मात कराल. उधारी वसूल होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

Edited By - Prashant Patil