आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 09 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 9 August 2020

पंचांग -
रविवार - श्रावण कृ. 6, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.16, सूर्यास्त 7.06, चंद्रोदय रा.10.53, चंद्रास्त स.10.51, भारतीय सौर 17, शके 1942

पंचांग -
रविवार - श्रावण कृ. 6, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन, सूर्योदय 6.16, सूर्यास्त 7.06, चंद्रोदय रा.10.53, चंद्रास्त स.10.51, भारतीय सौर 17, शके 1942

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
क्रांतिदिन । नागासाकी दिन ।  जागतिक मूळ देशवासी दिन
१८९० - ‘मानापमान’ मधील धैर्यधराच्या भूमिकेबद्दल गाजलेले  प्रसिद्ध गायक अभिनेते केशवराव भोसले यांचा जन्म. हुबळी येथे त्यांनी  १ जानेवारी १९०८ रोजी ‘ललित कलादर्श संगीत नाटक मंडळी’ स्थापन केली.
१९०१ - मराठी नाटककार विष्णुदास भावे यांचे निधन. त्यांची पन्नासहून अधिक नाट्याख्याने ‘नाट्यकवितासंग्रह’ या नावाने प्रसिद्ध झाली आहेत.
१९०९ - कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जन्म. ‘कलोपासक’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह. एकशेवीस काव्यसंग्रह, चार नाटके, एक कादंबरी, आठ समीक्षा ग्रंथ, तीन प्रबंध, दोन प्रवासवर्णने, ३५ हजार ओळींचे एक महाकाव्य असे लेखन त्यांनी कन्नडमध्ये केले.
१९२० - ‘घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात’ या कवितेने समस्त मराठी जगताला परिचित असलेले भावकवी कृ. ब. निकुंब यांचा जन्म. त्यांचे ‘उज्ज्वला’, ‘ऊर्मिला’, ‘अनबन्धा’ इ. कवितासंग्रह, मृगावर्त हे खंडकाव्य आणि ‘सायसाखर’ हा बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहे.
१९२५ - प्रसिद्ध याज्ञिक व कीर्तनकार ह. भ. प. रामकृष्णबुवा कानडे यांचा जन्म. 
१९४२ - ‘चले जाव’ चळवळीला सुरवात. महात्मा गांधी आणि काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांसह अनेकांची धरपकड. देशभर तीव्र प्रतिक्रिया.
१९४५ - अमेरिकेने जपानमधील नागासाकी शहरावर अणुबाँब टाकला. हिरोशिमा व नंतर नागासाकी या शहरांच्या विध्वंसामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.
१९९३ - भारत छोडो चळवळीच्या सुवर्णजयंती समारोहाच्या सांगता समारंभानिमित्ताने सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान यांच्या तिकिटाचे प्रकाशन.
२००० - भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
२००२ - ज्येष्ठ सामाजिक नेत्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचे निधन.

दिनमान -
मेष :
वस्तू हरविण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.
वृषभ : अनेक गोष्टी मनासारख्या घडतील. आर्थिक लाभ होतील.
मिथुन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : तुमचे निर्णय अचूक ठरतील. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे.
सिंह : दिवस प्रतिकूल आहे. कोणतेही जोखमीचे काम करू नका.
कन्या : अनेकांचे सहकार्य मिळवाल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
तूळ : व्यवसायात साहस करू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृश्‍चिक : कर्तृत्वाला संधी लाभेल. अनेक गोष्टीत यश लाभणार आहे.
धनू : काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : तुम्ही इतरांना योग्य मार्गदर्शन करू शकाल. विरोधकावर मात कराल.
कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
मीन : हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 09th August 2020