आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०९ जुलै

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

पंचांग -
गुरुवार - आषाढ कृ. ४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. १०.३७, चंद्रास्त स.९.४३, भारतीय सौर १८, शके १९४२.

पंचांग -
गुरुवार - आषाढ कृ. ४, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०५, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा. १०.३७, चंद्रास्त स.९.४३, भारतीय सौर १८, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८१९ - शिवणयंत्राचे संशोधक इलियास होव यांचा जन्म. दुहेरी टाक्‍याच्या तंत्राचा वापर असलेल्या या यंत्राचा शोध मानवी इतिहासातील अतिशय महत्त्वाचा शोध मानला जातो.
१९६८ - संत साहित्याचे गाढे अभ्यासक, सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य शंकर वामन उर्फ सोनोपंत दांडेकर यांचे निधन. मामासाहेब दांडेकर या नावानेही ते परिचित होते. 
१९९३ - ज्येष्ठ संगीतकार व वाद्यवृंद संयोजक सोनीक-ओमी या जोडीतील सोनीक यांचे निधन.
१९९५ - महाराष्ट्र राज्याचे पहिले क्रीडा संचालक व शिवछत्रपती पारितोषिक विजेते दिगंबर गोपाळ वाखारकर यांचे निधन. 
१९९७ - विख्यात सतारवादक पंडित रवी शंकर आणि इतिहासतज्ज्ञ रोमिला थापर यांची जपान आर्ट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड.
१९९९ - अमेरिकेच्या ‘अपोलो’ या अंतराळ मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारे तिसरे अंतराळवीर चार्ल्स पीट कोन्रॅड यांचे निधन.
२००० - अमेरिकेच्या पीट सॅंप्रासने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विंबल्डन स्पर्धा सातव्यांदा जिंकली. सॅंप्रासने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमरसन यांचा बारा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम मागे टाकला.

दिनमान -
मेष :
आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 
वृषभ : नोकरी, व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. 
मिथुन : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस चांगला जाईल. गुरुकृपा लाभेल.
कर्क : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आरोग्याची काळजी घ्यावी. 
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
कन्या : मनोरंजनाकडे कल राहील, तर काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. 
तूळ : मुलामुलींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. अनुकूलता लाभेल.
वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. शांत व संयमी रहावे. 
धनू : वरिष्ठांची व थोरामोठ्यांची कृपा लाभेल. नियमित योगासने करावीत. 
मकर : व्यवसायामध्ये समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची वार्ता समजेल.
कुंभ : गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल.
मीन : मुलामुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 09th July 2020