esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० फेब्रुवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

बुधवार - पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर,चंद्रोदय सकाळी ६.४७,चंद्रास्त सायंकाळी ५.१६,शिवरात्री,अमावास्या प्रारंभ उत्तर रात्री १.०९,भारतीय सौर माघ २० शके १९४२. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १० फेब्रुवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बुधवार - पौष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ६.४७, चंद्रास्त सायंकाळी ५.१६, शिवरात्री, सूर्योदय -७.०५, सूर्यास्त - ६.३१, अमावास्या प्रारंभ उत्तर रात्री १.०९, भारतीय सौर माघ २० शके १९४२. 

दिनविशेष
१९१० : विख्यात लेखिका,  संशोधिका, तत्त्ववेत्त्या आणि निसर्गाच्या विचक्षण अभ्यासक  दुर्गाबाई भागवत यांचा जन्म.
१९४९ : पुणे विद्यापीठाची स्थापना.
१९७४ : ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी यांचे निधन. ब्राह्मणेतर चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात त्यांचा पुढाकार होता.
१९८२ : प्रख्यात विचारवंत, समीक्षक नरहर कुरुंदकर यांचे निधन.
१९९४ : सौर ऊर्जेवर चालणारा जगातील पहिला बॅटरी चार्जर बनविण्यात ‘सेंट्रल इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड’ (सीईएल) या कंपनीला यश. फिरत्या संदेशवहन यंत्रणेसाठी व मुख्यत्वे लष्करासाठी हा बॅटरी चार्जर उपयुक्त ठरेल.
१९९७ : व्यसनमुक्ती चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या, ‘मुक्‍तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनिता अनिल अवचट यांचे निधन.
२००१ : पुण्यातील नामवंत प्रभात ब्रास बॅंडचे संस्थापक भालचंद्र वासुदेव ऊर्फ अण्णासाहेब सोलापूरकर यांचे निधन.
२००३ : महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीगीर अमृता मोहोळ यांचे निधन.


दिनमान
मेष : गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात संधी लाभेल.
वृषभ : काहींना गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे. महत्त्वाची वार्ता समजेल.
कर्क : आजचा दिवस अनेक दृष्टीने चांगला जाईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : संततिसौख्य लाभेल. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील.
तुळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.
वृश्‍चिक  : ट्रान्स्पोर्ट क्षेत्रातील व्यक्‍तींसाठी दिवस चांगला आहे. 
धनु : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल.
कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
मीन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.
प्रा. रमणलाल शहा