esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - आषाढ कृ.५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.१३, चंद्रास्त स.१०.३३, भारतीय सौर १९, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - आषाढ कृ.५, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.१३, चंद्रास्त स.१०.३३, भारतीय सौर १९, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
मातृसुरक्षादिन
१९२३ - प्रसिद्ध मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा जन्म. त्यांचे पूर्ण नाव गुरुनाथ आबाजी कुलकर्णी. ‘निळासावळा’ व ‘रक्तचंदन’ या त्यांच्या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके मिळाली.
१९४९ - विक्रमवीर, ‘लिटल मास्टर’ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांचा जन्म. त्याचे चाहते त्याला ‘सनी’ या नावाने ओळखतात.
१९६९ - गोव्याचे विख्यात इतिहाससंशोधक व पोर्तुगीज कागदपत्रांचे अभ्यासक डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचे निधन. १५२६ मध्ये कृष्णदास श्‍यामा यांनी लिहिलेल्या ग्रंथाची प्रत त्यांनी लिस्बनहून आणली आणि गोव्याची लिखित भाषा पूर्णपणे मराठी होती हे प्रस्थापित केले.
१९९२ - पुणे, आर्वी येथील ‘विक्रम इनमरसॅट भू-केंद्र’ केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री राजेश पायलट यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
१९९५ - ‘गरिबांचे डॉक्‍टर’ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.रामकृष्ण ऊर्फ दादासाहेब विष्णू केळकर यांचे निधन. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘अभिनव भारत मंदिरा’चे ते माजी अध्यक्ष होते.
२००० - विज्ञानाच्या प्रसारासाठीच्या कार्याबद्दल नेहरू तारांगणातर्फे दिला जाणारा मनुभाई मेहता पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.

दिनमान -
मेष :
संततिसौख्य लाभेल. वैवाहिक सौख्य लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : आरोग्य चांगले राहील. व्यवसायात नवीन तंत्र  व मंत्र अंमलात आणू शकाल. 
मिथुन : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायतील निर्णय घेऊ शकाल. 
कर्क : कोणत्याही कामामध्ये घाई गडबड करू नये. काहींचा दिवस आळसात जाईल. 
सिंह : भागीदारी व्यवसायातील निर्णय घेऊ शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. 
कन्या : आरोग्य चांगले राहील. वैवाहिक जीवनातील वादविवाद टाळावेत. काहींना संधी लाभेल.
तूळ : शासकीय व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल.
वृश्‍चिक : शासकीय कामे पुढे ढकलावीत. काहींना कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनू : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. आरोग्य चांगले राहणार आहे. संततिसौख्य लाभेल.
मकर : आरोग्याच्या तक्रारी हळूहळू कमी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : प्रॉपर्टीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. घराचे प्रश्‍न सोडवाल. 
मीन : वादविवादांपासून दूर राहावे. काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल राहील. 

Edited By - Prashant Patil