esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - ज्येष्ठ कृ. ५ चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.११ चंद्रास्त स.१०.०७  भारतीय सौर २०, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १० जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - ज्येष्ठ कृ. ५ चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.११ चंद्रास्त स.१०.०७  भारतीय सौर २०, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष -
जागतिक दृष्टिदान दिन । अल्कोहोलिक ॲनानिमस स्थापना दिन

१९०४ - गुरुवर्य डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा जन्म. पुण्यातील नू. म. वि. आणि स. प. महाविद्यालय या शिक्षण संस्थांत त्यांनी अध्यापन केले. सखोल व विस्तृत वाचनामुळे व रोचक वक्तृत्वामुळे त्यांचे अध्यापन विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रनिष्ठा, व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, विज्ञाननिष्ठा यांचे संस्कार करीत असत. 
१९३८ - प्रसिद्ध उद्योगपती व बजाज उद्योगसमूहाचे प्रमुख राहुलकुमार बजाज यांचा जन्म. त्यांना ‘पद्मभूषण’ सन्मानाने गौरविण्यात आले.
१९९८ - स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अनुयायी, अंगरक्षक आणि सावरकरांच्या विचारांचे प्रसारक अप्पा कासार यांचे निधन.
१९९९ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ‘नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’साठी निवड.
२००१ - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या फुलवंताबाई झोडगे यांचे निधन.  सावित्रीबाई फुले यांच्यावर पहिले पुस्तक झोडगेअक्कांनी लिहिले होते.
२००२ - प्रसिद्ध शाहीर निवृत्ती बाबूराव पवार यांचे निधन. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनमान -
मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.
वृषभ : तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. तडफेने कामे पार पाडाल.
मिथुन : ग्रहमान प्रतिकूल आहे. मुलामुलींच्याकरिता खर्च होईल.वैवाहिक सौख्य लाभेल.
कर्क : अनेकांचे सहकार्य मिळेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
सिंह  : खर्च वाढतील. मनोबल वाढेल.मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या : आत्मविश्‍वास वाढेल. सामाजिक कार्यात यश लाभेल. कामे मार्गी लागतील.
तूळ : आरोग्याकडे लक्ष हवे. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा नको.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात वाढ होईल.
धनू : आर्थिक क्षेत्रात धाडस करायला हरकत नाही. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
कुंभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. अडचणीवर मात कराल.
मीन : महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.