आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 10 ऑक्टोबर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

पंचांग -
शनिवार - अधिक आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१४, चंद्रोदय रात्री १२.४०, चंद्रास्त दुपारी १.२४, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - बेडूक, भारतीय सौर १८ शके १९४२.

पंचांग -
शनिवार - अधिक आश्विन कृष्ण ८, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१४, चंद्रोदय रात्री १२.४०, चंद्रास्त दुपारी १.२४, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन - बेडूक, भारतीय सौर १८ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
राष्ट्रीय टपाल दिन । जागतिक मानसिक आरोग्य दिन

१९५४ : आचार्य अत्रे यांच्या ‘श्‍यामची आई’ या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक. चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देण्याला या वर्षापासून सुरवात झाली.
१९५४ : चिरंतर सौंदर्याचे वरदान लाभलेली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा हिचा जन्म. तिने ‘सावन भादो’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.  सुमारे अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.
१९६४ : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते गुरुदत्त यांचे निधन. त्यांचे चौदहवी का चाँद, कागज के फूल, सी.आय.डी., मि.अँड मिसेस ५५, आरपार, प्यासा इ. अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहब बीबी और गुलाम’ या चित्रपटास राष्ट्रपतिपदक मिळाले.
१९९३ : विख्यात कन्नड लेखक वरदराज हुल्लगोळ यांचे निधन. त्यांनी अनेक कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या आहेत. 
१९९७ : पुण्याचे माजी महापौर व शहर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव जगन्नाथराव भोसले यांचे निधन.
१९९७ : ख्यातनाम संगीत दिग्दर्शक आणि गायक हृदयनाथ मंगेशकर यांची गानसम्राज्ञी लता मंगेशकर राज्य पुरस्कारासाठी निवड.
२००३ :  राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे स्मृतिस्थळ देशाला अर्पण. राजीव गांधी यांची श्रीपेरांबुदूर येथे २१ मे १९९१ ला हत्या झाली होती. निवडणूक सभेसाठी येथे आले असता मानवी बाँबद्वारे गांधी यांची हत्या झालेल्या ठिकाणी हे स्मृतिस्थळ उभारण्यात आले आहे.

दिनमान -
मेष :
एखादी भाग्यकारक घटना घडेल.  काहींना अचानक धनलाभ संभवतो.
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल.  कौटुंबिक सौख्य लाभेल. 
मिथुन : प्रवासाचे बेत टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. मानसिक अस्वस्थता राहील.
कर्क : मानसिक अस्वस्थता राहील. एखादी मनस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. 
सिंह : मनोबल उत्तम राहील. अचानक धनलाभ संभवतो. अपेक्षित गाठीभेटी पडतील. 
कन्या : व्यवसायातील कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
तुळ : महत्त्वाच्या तसेच दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. 
वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. वैवाहिक सौख्य लाभेल. 
धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम राहील. 
मकर : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. कामात अडचणी जाणवण्याची शक्यता आहे. 
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रवास सुखकर होतील.
मीन : व्यवसायातील अडचणी कमी होतील. दैनंदिन कामे यशस्वी होतील. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 10th october 2020