esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - श्रावण कृ. 7, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, चंद्रोदय रा.11.56, चंद्रास्त दु.12.27, भारतीय सौर 19, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - श्रावण कृ. 7, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, श्रीकृष्ण जयंती, कालाष्टमी, चंद्रोदय रा.11.56, चंद्रास्त दु.12.27, भारतीय सौर 19, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९७० - थोर समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ ज्येष्ठ संशोधक डॉ. इरावती कर्वे यांचे निधन. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. ‘परिपूर्ती’, ‘भोवरा’, ‘मराठी लोकांची संस्कृती’, ‘युगान्त’ हे त्यांचे महत्त्वाचे मराठी ग्रंथ होत. 
१८७७ - अमेरिकन खगोलविद हॉलद्वारा मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्रांचा शोध.
१९०८ - प्रसिद्ध क्रांतिकारक खुदीराम बोस यांना फाशी देण्यात आले. त्या वेळी त्यांचे वय केवळ अठरा वर्षांचे होते.
१९१६ - माजी लष्करप्रमुख जनरल गोपाळराव बेवूर यांचा जन्म. परमविशिष्ट सेवा पदक व पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. लष्करप्रमुख होणारे ते पहिले मराठी भाषक अधिकारी.
१९२८ - ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार वि. स. वाळिंबे यांचा जन्म.
१९९३ - तत्कालीन दिल्ली राज्याचे पहिले मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यांचे निधन.

दिनमान -
मेष :
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
वृषभ : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पूर्ण होतील. 
मिथुन : भागीदारी व्यवसायात यश लाभेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी. 
कर्क  : नातेवाइकांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत.
सिंह : विरोधकांवर मात कराल. शत्रुपिडा नाही. कोणालाही जामीन राहू नका.
कन्या : वाहन खरेदीसाठी आजचा दिवस चांगला आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. 
तूळ : मानसन्मानाचे योग येतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अधिकार, कीर्ती लाभेल.
वृश्‍चिक : संततीच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
धनू : आजचा दिवस आनंदी आहे. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी दिवस चांगला. 
मकर : तुम्ही आपली मते इतरांवर लादू नका. अनावश्‍यक कारणासाठी खर्च होतील.
कुंभ : वाहन खरेदीसाठी दिवस चांगला आहे. विविध प्रकारचे लाभ होतील. 
मीन : शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. उष्णतेचे विकार उद्‌भवतील. 

Edited By - Prashant Patil