आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ११ जुलै

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

पंचांग -
शनिवार - आषाढ कृ. ६, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.४७, चंद्रास्त स. ११.२२, भारतीय सौर २०, शके १९४२.

पंचांग -
शनिवार - आषाढ कृ. ६, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१६, चंद्रोदय रा.११.४७, चंद्रास्त स. ११.२२, भारतीय सौर २०, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१६६७ - अंबरच्या राजघराण्यातील मिर्झा राजे जयसिंह यांचे निधन. शिवाजी महाराजांविरुद्ध पाठविलेल्या मोगल फौजेचे ते सेनापती होते.
१८८९ - प्रसिद्ध कादंबरीकार नारायण हरी आपटे यांचा जन्म. ‘सुखाचा मूलमंत्र’, ‘पहाटेपूर्वीचा काळोख’, ‘उमज पडेल तर’, ‘ एकटी’ या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत.
१९२१ - ज्येष्ठ साहित्यिक शंकरराव खरात यांचा जन्म. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.
१९३० - विख्यात क्रिकेटपटू डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी ३०९ धावा करून विक्रम प्रस्थापित केला.
१९५७ - इस्लाम धर्माच्या शिया पंथातील ‘निझारी इस्रायली’ या एका उपपंथाचे प्रमुख प्रिन्स आगाखान (तिसरे) सुलतान सर मुहंमद शाह यांचे स्वित्झर्लंडमध्ये निधन.
१९९२ - ज्येष्ठ पत्रकार व अर्थतज्ज्ञ गोविंद मंगेश लाड यांचे निधन. मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते पहिले विश्वस्त होत.
१९९४ - रणांगणातील असामान्य कामगिरीबद्दलचा ‘परमवीरचक्र’ हा सर्वोच्च सन्मान मिळविणारे मेजर (निवृत्त) रामराव राघोबा राणे यांचे निधन. हा गौरव मिळविणारे ‘बाँबे सॅपर्स’चे आणि महाराष्ट्रातील ते एकमेव लष्करी अधिकारी होते.
१९९४ - दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग) किरण बेदी यांना  ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर.
१९९७ - कोल्हापुरातील ज्येष्ठ कुस्तीगीर आणि हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविलेले मल्ल के. डी. माणगावे यांचे निधन.

दिनमान -
मेष : प्रॉपर्टीचे व्यवहार नकोत. महत्त्वाची शुभ कामे पुढे ढकलावीत. 
वृषभ : वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मिथुन : कर्तृत्वाला संधी मिळेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य चांगले राहील.
सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
कन्या : उत्साह, उमेद वाढेल. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.
तूळ : आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक : मानसिक उत्साह वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
धनू : प्रॉपर्टीच्या संदर्भात दिवस चांगला आहे. गुंतवणुकीलाही चांगला आहे.
मकर : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.
कुंभ : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
मीन : व्यवसायाच्या संदर्भात दिवसभर कार्यरत राहाल. भाग्यकारक घटना घडेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 11th July 2020