esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 जून 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 जून 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : ज्येष्ठ शुद्ध १, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ६.३२, चंद्रास्त रात्री ८.०६, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०९, गंगादशहरारंभ, करिदिन, इष्टि, चंद्रदर्शन, भारतीय सौर ज्येष्ठ २१ शके १९४३.भारतीय सौर ज्येष्ठ २० शके १९४३.

दिनविशेष -

१९५० : नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक, थोर स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचे निधन. ‘श्‍यामची आई’ हे अजरामर पुस्तक त्यांनी लिहिले.

१९८३ : भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्‍यामदास बिर्ला यांचे निधन.

१९९७ : पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत ‘सुखोई-३० के’ ही रशियन बनावटीची विमाने हवाई दलात दाखल.

१९९७ : प्रसिद्ध उर्दू कादंबरीकार शकील जमाली यांचे निधन. १९५२ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘फिरदौस’ ही पहिली कादंबरी लिहिली. ती अतिशय गाजली.

२००० : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.

दिनमान -

मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : आरोग्याच्यात तक्रारी कमी होतील. मनोबल वाढेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : वाहने सावकाश चालवावीत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : आर्थिक सुयश लाभेल. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

धनु : वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : मनोरंजनाकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.