आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 नोव्हेंबर 2021 | Horoscope | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 नोव्हेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 नोव्हेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : कार्तिक शुद्ध ७/८, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय दुपारी १.०३, चंद्रास्त रात्री १२.३१, सूर्योदय ६.४०, सूर्यास्त ५.५६, गोपाष्टमी, दुर्गाष्टमी, गाईचे पूजन व प्रदक्षिणा (गाईचे मागून चालावे), भारतीय सौर कार्तिक २० शके १९४३.

दिनविशेष -

२००९ : ‘पुलोत्सवा’त गानसरस्वती किशोरी आमोणकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते ‘पुल स्मृती सन्मान’ प्रदान.

२००९ : भारताच्या ओमप्रकाशने १८ व्या आशियायी मैदानी स्पर्धेत गोळाफेक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

२०१० : ‘आधुनिक क्रिकेटचा सम्राट’ म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर सहा विश्‍वकरंडक खेळणारा केवळ दुसरा फलंदाज ठरला.

दिनमान -

मेष : प्रतिष्ठा लाभेल . कामे मार्गी लागतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण जाणवेल.

कर्क : वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

कन्या : काहींची वैचारिक प्रगती होईल. नवीन परिचय होतील.

तुळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

धनु : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : कोणालाही जामीन राहू नका. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

loading image
go to top