आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 ऑक्टोबर

Bhavishya
Bhavishya

पंचांग -
रविवार - अधिक आश्विन कृष्ण ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, चंद्रोदय रात्री १.३९, चंद्रास्त दुपारी २.१६, भारतीय सौर १९ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४६ - जगप्रसिद्ध सेंटर फॉर डेव्हलपमेंट फॉर ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) या प्रगत संगणकीय विकसन केंद्राचे संस्थापक, ख्यातनाम संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जन्म. आठ ग्रंथांचे लेखन, संपादन तसेच पाऊणशे शोधनिबंधांमुळे संगणकीय विज्ञान क्षेत्रात त्यांनी मोलाची भर घातली.
१९६८ - राष्ट्रसंत, समाजसुधारक म्हणून ओळखले जाणारे तुकडोजी महाराज यांचे निधन. त्यांचे खरे नाव माणिक बंडोजी ठाकूर. त्यांनी ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हटले जाते. ‘ग्रामगीता’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यात लोकशिक्षण, न्यायरक्षण आणि श्रमदान यांचे महत्त्व आणि उत्तर प्रचार तंत्र संघटनशक्तीचा महिमा, शिक्षण, महिलोन्नती, अंधश्रद्धा निर्मूलनाची महती वर्णन केली आहे.
१९९४ - ज्येष्ठ उद्योगपती आणि कॅम्लिन उद्योगसमूहाचे संस्थापक दिगंबर परशुराम ऊर्फ काकासाहेब दांडेकर यांचे निधन.
१९९४ - खडकी येथील दारूगोळा कारखान्यातील ‘एल-१’ विभागाच्या एका इमारतीत स्फोट होऊन आठ कामगार ठार व चौघे जखमी.
१९९७ - आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले शिल्पकार आणि ललित कला अकादमीचे माजी सदस्य विपुल कांती साहा यांचे निधन.
१९९७ - गायन क्षेत्रात इचलकरंजीचे नाव देशभर करणारे ज्येष्ठ गायक दत्तात्रय विष्णू काणे यांचे निधन.
१९९९ - ‘नागीण’, ‘आघात’, ‘पंढरीची वारी’ यांसारखे पारितोषिकप्राप्त चित्रपटांचे दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांचे निधन.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. कामे रखडण्याची शक्यता आहे.
वृषभ : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.
मिथुन : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. अपेक्षित पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील.
कर्क : तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता आहे. 
कन्या : सुसंधी लाभेल. मित्रमैत्रिणींचा सल्ला लाभदायक ठरेल. विविध लाभ होतील.
तुळ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. 
वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी, प्रसिद्धी लाभेल. प्रवासाचे योग येतील.
धनु : आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अचानक धनलाभाची शक्यता आहे. 
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. वादविवाद टाळावेत. सुसंवाद साधाल.
कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता आहे. 
मीन : संततीच्या तक्रारी जाणवतील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com