esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद कृ.9, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय रा. 12.06, चंद्रास्त दु. 1.49, भारतीय सौर 20, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 11 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार - भाद्रपद कृ.9, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.24, सूर्यास्त 6.40, चंद्रोदय रा. 12.06, चंद्रास्त दु. 1.49, भारतीय सौर 20, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८९५ - थोर गांधीवादी, भूदान चळवळीचे प्रणेते, आचार्य विनोबा भावे (विनायक नरहर भावे) यांचा जन्म. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. सरकारने विनोबांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान केला.
१९०१ - नामवंत मराठी कवी आत्माराव रावजी देशपांडे ऊर्फ कवी अनिल यांचा जन्म.  ‘फुलवात’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. त्यांची प्रेम आणि जीवन भग्नमूर्ती, निर्वासित, चिनी मुलास ही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रौढ शिक्षणविषयक कार्याबद्दल त्यांना नेहरू पारितोषिक मिळाले होते.
१९९३ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अभि भट्टाचार्य यांचे निधन. 
१९९८ - ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिक्षणमहर्षी प्रिं. एन. डी. नगरवाला यांचे निधन.
१९९८ - नगरच्या वाहन संशोधन व विकास संस्थेने दूरनियंत्रकाच्या साह्याने चालविल्या जाणाऱ्या मानवरहित विमानासाठी विकसित केलेल्या इंजिनाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते अनावरण.
२००१ - मध्ययुगीन मराठी साहित्य व दख्खनी भाषेचे व्रतस्थ अभ्यासक आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. श्रीधर रंगनाथ कुलकर्णी यांचे निधन.
२००१ - न्यूयॉर्कच्या बहुमजली वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक अशी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या घनघोर हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी. 
२००४ - ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा  जीवनगौरव पुरस्कार नृत्यक्षेत्रातील गुरू पार्वतीकुमार यांना जाहीर.

दिनमान -
मेष  :
तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. प्रवासाचे योग येतील.
वृषभ : अचानक धनलाभ संभवतो. शासकीय कामे मार्गी लावू शकाल. वसूली होईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय अचूक ठरतील. रखडलेली कामे मार्गी लावाल. 
कर्क  : कामे रखडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. 
सिंह : प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. 
कन्या : मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून यश मिळवाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. 
तूळ : सार्वजनिक क्षेत्रात मान व प्रतिष्ठा लाभेल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. 
वृश्‍चिक : काहींना नैराश्य जाणवेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. 
धनू : मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. मनोबल उत्तम राहील. 
मकर  : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. प्रवासात काळजी घ्यावी. 
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. संततीच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडेल.
मीन : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Edited By - Prashant Patil