esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 सप्टेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : भाद्रपद शुद्ध ५, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.०१, ऋषिपंचमी, जैन संवत्सरी (पंचमी पक्ष), भारतीय सौर भाद्रपद २० शके १९४३.

दिनविशेष -

१८९५ : थोर गांधीवादी, भूदान चळवळीचे प्रणेते, आचार्य विनोबा भावे (विनायक नरहर भावे) यांचा जन्म. १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. सरकारने विनोबांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान प्रदान केला.

१९९८ : नगरच्या वाहन संशोधन व विकास संस्थेने (व्हीआरडीई) दूरनियंत्रकाच्या साह्याने चालविल्या जाणाऱ्या मानवरहित विमानासाठी विकसित केलेल्या इंजिनाचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते अनावरण.

२००१ : न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी एकापाठोपाठ एक अशी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या घनघोर हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी, तसेच पेंटॅगॉन या अमेरिकेच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात दहा कोटी डॉलरचे नुकसान.

२००४ : ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार नृत्यक्षेत्रातील गुरू पार्वतीकुमार यांना जाहीर.

दिनमान -

मेष : आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने सावकाश चालवावीत. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. नवीन परिचय होतील.

कर्क : प्रवासाचे योग येतील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनू : काहींची वैचारिक प्रगती होईल. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल.

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभ संभवतो. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

loading image
go to top