esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
बुधवार - श्रावण कृ. 8, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रा.12.04, चंद्रास्त दु.1.18, भारतीय सौर 20, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 12 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - श्रावण कृ. 8, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय 6.17, सूर्यास्त 7.04, चंद्रोदय रा.12.04, चंद्रास्त दु.1.18, भारतीय सौर 20, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक युवा दिन 

१८४८ - आगगाडीच्या इंजिनाचा शोध लावणारा संशोधक जॉर्ज स्टीफन्सन यांचे निधन.
१९०० - अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जेम्स एडवर्ड कीलर यांचे निधन. शनीच्या कड्यांविषयी त्यांचे संशोधन विशेष मानले जाते. त्यांनी अनेक तेजोमेघ शोधून काढले. ‘स्पेक्‍ट्रॉस्कोपिक ऑब्व्हाकेशन ऑफ नेब्युला’ हा त्यांचा ग्रंथ प्रसद्ध आहे.
१९१९ - भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म.
१९२६ - गणेशमूर्तिकार ते शिल्पकार असा कलात्मक प्रवास करणारे बी. आर. ऊर्फ अप्पासाहेब खेडकर यांचा जन्म. कलाकारांचे हुबेहुब मुखवटे तयार करून डमीसाठी ते वापरण्याचा प्रयोग त्यांनीच प्रथम सुरू केला.
१९४८ - लंडनमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळविले.
१९६८ - नामवंत विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांचे निधन.
१९९८ - भारतीय क्रिकेट संघातील तडाखेबंद आणि दर्जेदार फलंदाज सचिन तेंडुलकर याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
प्रवासात वस्तू गहाळ होण्याची शक्‍यता आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल. 
वृषभ : ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील व्यक्‍तींना दिवस चांगला आहे. कौटुंबिक वादविवाद टाळावेत. 
मिथुन : नातेवाइकांचे सौख्य लाभेल. शासकीय कामे होतील. अधिकार पद प्राप्त होईल.
कर्क  : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 
सिंह : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. धनलाभाची शक्‍यता आहे.
कन्या : नवीन परिचय होतील. कला, मनोरंजनाकडे कल राहील. व्यवसायात प्रगती.
तूळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. 
वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. तुम्हाला तुमच्या क्षेत्रात मान, प्रतिष्ठा लाभेल.
धनू : सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मकर : आजचा दिवस प्रतिकूल आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कुंभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. संततीच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उधारी वसूल होईल.

Edited By - Prashant Patil