esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १२ जुलै

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - आषाढ कृ. ७, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१६, कालाष्टमी चंद्रोदय रा.११.५७, चंद्रास्त दु. १२.१०, भारतीय सौर २१, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १२ जुलै
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - आषाढ कृ. ७, चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा, चंद्रराशी मीन, सूर्योदय ६.०७, सूर्यास्त ७.१६, कालाष्टमी चंद्रोदय रा.११.५७, चंद्रास्त दु. १२.१०, भारतीय सौर २१, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८६४  - इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचा जन्म. भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. विषयांवरही त्यांनी संशोधन, लेखन केले. 
१९६१ - मुठा नदीच्या आंबी या उपनदीवरील पानशेत धरण फुटून पुणे शहराला महापुराचा तडाखा बसला. नदीकाठच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील घरे, दुकाने, बॅंका, शाळा, ग्रंथालये आदींना पुराचा तडाखा बसून मोठी हानी झाली.
१९९४ - हिंदी व मराठी चित्रपट क्षेत्राचा चालता बोलता इतिहास, ज्ञानकोश म्हणून गौरविले जाणारे प्रसिद्ध पटकथालेखक व ‘बॉम्बे पब्लिसिटी सर्व्हिस’चे संचालक वसंत साठे यांचे निधन. 
१९९५ - अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९८ - सोळाव्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझीलचा ३-० असा पराभव करून विश्‍वकरंडक जिंकला.
१९९९ - ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राजेंद्रकुमार यांचे निधन.  त्यांचे ‘सूरज’, ‘गीत’, ‘आप आये बहार आयी’, ‘संगम’, ‘झुक गया आसमान’, ‘मेरे मेहबूब’, ‘आरजू’, ‘हमराही’ आदी चित्रपट विशेष गाजले.
१९९९ - ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावसकर यांना प्रदान.
१९९९ - नामवंत खगोलशास्त्रज्ञ डॉ. रमतोष सरकार यांचे कलकत्ता येथे निधन.
२००१ - ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर.
२००३ - ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मधील प्रसिद्ध पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांना ‘व्होल्व्हो एन्व्हायरन्मेंट’ पारितोषिक जाहीर. हे पारितोषिक १५ लाख क्रोनरचे (८५ लाख रुपये) आहे.

दिनमान -
मेष : आरोग्याकडे लक्ष द्यावे. वस्तू हरविणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
वृषभ : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.
कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरणार आहेत.
सिंह : दिवस बराचसा प्रतिकूल आहे. महत्त्वाच्या गोष्टी पुढे ढकलाव्यात.
कन्या : मित्रांचे सहकार्य लाभेल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल.
तूळ : व्यवसायात अडचणी जाणवतील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात आर्थिक प्राप्ती चांगली होईल.
धनू : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना यश मिळेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : मनोरंजनाकडे कल वाढेल. विरोधकावर मात कराल.
कुंभ : उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे.
मीन : हाती घेतलेली कामे मार्गी लागतील. यश, प्रतिष्ठा लाभणार आहे.

Edited By - Prashant Patil