esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 ऑक्टोबर 2021 | Horoscope
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 ऑक्टोबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 12 ऑक्टोबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

पंचाग - मंगळवार : आश्विन शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दु. १२.२४, चंद्रास्त रा. ११.३५, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१३, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे), सरस्वती पूजन, भारतीय सौर आश्विन २० शके १९४३.

दिनविशेष -

२००० - चार अयशस्वी प्रयत्नांनंतर अमेरिकेच्या डिस्कव्हरी अवकाशयानाचे यशस्वी उड्डाण. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे अवकाशस्थानक तयार करण्याच्या तयारीचा एक भाग म्हणून हे उड्डाण करण्यात आले.

२००१ - संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल जाहीर.

२००६ - तुर्कस्तानचे साहित्यिक ओरहान पामुक यांना साहित्याचा ‘नोबेल’ जाहीर.

२०१५ - ब्रिटिश-अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ प्रा. अँगस डेटन यांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर.

दिनमान -

मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक सौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. कामात यश लाभेल.

वृश्‍चिक : आर्थिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : काहींना कामाचा ताण जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

मीन : प्रवास सुखकर होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

loading image
go to top