esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १३ जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय स. ७.४५, चंद्रास्त सायं. ६.३०,इष्टि, धनुर्मास समाप्ती, भोगी, (अमावास्या समाप्ती स. १०.३०), सौर पौष २३ शके १९४२. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १३ जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय स. ७.४५, चंद्रास्त सायं. ६.३०, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५  इष्टि, धनुर्मास समाप्ती, भोगी, (अमावास्या समाप्ती स. १०.३०), सौर पौष २३ शके १९४२. 

------------------------------------------------------------

दिनविशेष
१८८९ - नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेल्या ‘शारदा’ या नाटकाचा प्रथम प्रयोग इंदूर येथे झाला. या प्रयोगात पहिले तीन अंकच सादर करण्यात आले.
१९०५ - मराठी रंगभूमीवरील व भारतीय चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेत्री दुर्गा खोटे यांचा मुंबई येथे जन्म.
१९३८ - विख्यात संतूरवादक, संतूर वाद्याला शास्त्रीय संगीतात स्थान देणारे पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म.
१९५० - हिराकूड धरणाचे पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्‌घाटन.
१९६७ - पुण्यातील स. प. महाविद्यालयाचा सुवर्णमहोत्सव श्री. चिंतामणराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न.
१९९७ - पारखे उद्योगसमूहाचे संस्थापक व प्रसिद्ध उद्योगपती मल्हार सदाशिव ऊर्फ बाबूराव पारखे यांचे निधन.
१९९८ - प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक व नृत्य दिग्दर्शक शंभू सेन यांचे निधन.
२००० - प्रसिद्ध सतारवादक अब्दुल करीम खाँ यांचे निधन.

------------------------------------------------------------
दिनमान
मेष : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
वृषभ : प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींना गुरूकृपा लाभेल.
मिथुन : वैवाहिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. शत्रुपिडा नाही.
कर्क : हितशत्रुंचा त्रास संभवतो. आरोग्य उत्तम राहील. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.
वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. 
धनु : आरोग्य उत्तम राहील. साहित्यिक क्षेत्रासाठी दिवस चांगला आहे.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुंभ : नवीन परिचय होतील. प्रवास शक्‍यतो टाळावेत.
मीन : राजकारणात सहभागी व्हाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
प्रा. रमणलाल शहा

loading image