आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १३ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

शनिवार : माघ शुद्ध २, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.१३, चंद्रास्त रात्री ८.०५, चंद्रदर्शन, सूर्योदय - ७.०४,  सूर्यास्त - ६.३३, भारतीय सौर माघ २३ शके १९४२.

शनिवार : माघ शुद्ध २, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.१३, चंद्रास्त रात्री ८.०५, चंद्रदर्शन, सूर्योदय - ७.०४,  सूर्यास्त - ६.३३, भारतीय सौर माघ २३ शके १९४२.

दिनविशेष
१८७९ - ज्येष्ठ कवयित्री आणि स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू यांचा जन्म.
१९०१ - मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध गायक नट लक्ष्मण बापूजी ऊर्फ भाऊराव कोल्हटकर यांचे निधन.
१९९४ - ज्येष्ठ इतिहाससंशोधक यशवंत नरसिंह केळकर यांचे निधन. त्यांच्या लेखनातील ऐतिहासिक शब्दकोश आणि ऐतिहासिक पोवाडे हे फार मोलाचे मानले जातात.
२००३ - भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
२००४ - पुण्याच्या आमिश यतीन सरपोतदारने धरमतर खाडी न थांबता पोहण्याचा पराक्रम केला. आठ तासांत एकदाही न थांबता त्याने ही सागरी मोहीम यशस्वीपणे पार केली. धरमतर ते गेट वे हे ३६ किलोमीटरचे अंतर पार करताना जलतरणपटूंचा वेग, ताकद आणि दमसास याची कसोटी लागते.

दिनमान
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आरोग्य उत्तम राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.
वृषभ : काहींना सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल. 
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : कौटुंबिक जीवनात चिंता लागून राहील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : मित्रमैत्रिणींच्या आश्‍वासनांवर अवलंबून राहू नये. शत्रुपीडा नाही.
तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक  : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. व्यवसायामध्ये उत्तम स्थिती राहील.
मकर : आर्थिक सुयश लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रवास होतील.
कुंभ : व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : प्रवासामध्ये वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. 
प्रा. रमणलाल शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 13th February 2021