esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आषाढ शुद्ध ३, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सकाळी ८. ५०, चंद्रास्त रात्री १०, सूर्योदय ६.०६, सूर्यास्त ७.१३, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भद्रा, भारतीय सौर आषाढ २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९२४ : अर्थशास्त्रज्ञ अल्फ्रेड मार्शल यांचे निधन. ट्रायपॉस परीक्षेतील ते दुसरे रॅंग्लर होते. १८८५ ते १९०८ या कालावधीत ते केंब्रिजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. १९०२ पासून ‘रॉयल इकॉनॉमिक्‍स सोसायटी’ची स्थापना आणि ‘इकॉनॉमिक जर्नल’ या मासिकाची सुरुवात त्यांच्या पुढाकाराने झाली.

१६६० : पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटलेल्या शिवाजी महाराजांचा पाठलाग करणाऱ्या आदिलशाही फौजा घोडखिंडीत रोखून धरून बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणार्पण केले.

१९६९ : महर्षी न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे महानिर्वाण. अव्वल दर्जाची प्रतिभा, उच्च शब्दप्रभुत्व, सखोल सहृदयता आणि श्रेष्ठ प्रतीचे तत्त्वचिंतन या सर्व गुणांचा मधुर मिलाफ न्यायरत्न विनोद यांच्या ठिकाणी होता. १९५४ मध्ये टोकियोला भरलेल्या विश्वशांती परिषदेमध्ये न्यायरत्नांना ‘विश्वशांती सचिव’ ही बहुमानाची पदवी मिळाली.

दिनमान -

मेष : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. नातेवाइकांचा सहवास लाभेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे पार पडतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : वाहने सावकाश चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तूळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.जिद्द वाढेल.

धनू : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

loading image