esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १३ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृ. ८, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१२, कालाष्टमी, चंद्रोदय रा. १२.४० चंद्रास्त दु.१२.४२  भारतीय सौर २३, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १३ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शनिवार : ज्येष्ठ कृ. ८, चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.१२, कालाष्टमी, चंद्रोदय रा. १२.४० चंद्रास्त दु.१२.४२  भारतीय सौर २३, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९६७ - महाराष्ट्रातील एक नामवंत शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचे निधन. १९२३ मध्ये पुण्याच्या शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी बनविला होता. हा शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा. सरकारने त्यांना १९६४ मध्ये ‘पद्मश्री’ने सन्मानित केले होते.
१९६९ - अष्टपैलू साहित्यिक, विडंबनकार, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, आमदार, वक्ते अशा अनेक अंगांनी प्रसिद्ध असलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन. त्यांच्या ‘श्‍यामची आई’ चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक व ‘महात्मा फुले’ चित्रपटास रौप्यपदक मिळाले. ‘कऱ्हेचे पाणी’ या पाच खंडांतील आत्मचरित्रात त्यांनी आपली जीवनकथा सांगितली आहे.
१९९४ - ग्रंथालय प्रसार चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुण्यातील सिद्धार्थ ग्रंथालयाचे संस्थापक गणपतराव पवार यांचे निधन.
१९९५ - भारत आणि फ्रान्स यांच्यात गुंतवणूक सुरक्षिततेचा करार. परस्परांतील व्यापार वाढविण्यास, तसेच भारतीय उद्योगांतील फ्रेंच गुंतवणूक वाढविण्यास हा करार उपयुक्त.
१९९६ - आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी देण्यात येणाऱ्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर-बीन-मोहम्मद यांची निवड.
१९९७ - दक्षिण दिल्ली येथील उपहार चित्रपटगृहाला आग लागून किमान ५८ जण मृत्युमुखी.
२००० - स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतींत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. तीन तास या लढती सुरू होत्या.
२००३ - वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या बाजार संकुलाची उभारणी केल्याबद्दल सिडकोला ‘नगर नियोजन आणि आराखडा प्रकल्प अंमलबजावणी’ या संवर्गाअंतर्गत पंतप्रधानांचा द्वितीय पुरस्कार जाहीर.
 २००४ - भारत आणि रशियाची संयुक्त निर्मिती असलेल्या आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्राची चंडीपूरच्या तळावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. भारताची संरक्षण विकास आणि संशोधन संस्था आणि रशियाच्या ‘एनपीओ माशिनोस्त्रोयेनिया’ या संस्थेने ‘ब्राह्मोस’ विकसित केले आहे. स्वनातीत वेग असलेल्या या क्षेपणास्त्राचा पल्ला २९०किलोमीटरचा आहे. आठ मीटर लांबीचे हे क्षेपणास्त्र तीन टन वजनाचे असून, तीनशे किलो स्फोटके वाहून नेऊ शकते.

दिनमान -
मेष :
प्रियजनांसोबत वेळ घालवू शकाल. तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत. 
वृषभ : चिकाटीने कार्यरत राहणार आहात. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. 
मिथुन : तुमच्यावर असणारी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू शकाल. 
कर्क : कामाचा ताण जाणवणार आहे. अस्वस्थता राहणार आहे. जिद्दीने कार्यरत राहावे लागेल. 
सिंह : सकारात्मकपणे कार्यरत राहणार आहात. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कन्या : अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. बेकायदेशीर गोष्टी टाळाव्यात. 
तूळ : चिकाटीने कार्यरत राहू शकाल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. 
वृश्‍चिक : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. सकारात्मकता वाढेल. 
धनू : नवा मार्ग दिसेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. चिकाटी वाढेल.
मकर : आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. 
कुंभ : आर्थिक कामात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. 
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील.