esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १४ जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

गुरुवार : पौष शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.३१, मकर संक्रांती, चंद्रदर्शन, संक्रमण पुण्यकाळ सकाळी ८.१५ पासून सायंकाळी ४.१५ पर्यंत

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १४ जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गुरुवार : पौष शुद्ध १, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, चंद्रोदय सकाळी ७.४५, चंद्रास्त सायंकाळी ७.३१, मकर संक्रांती, चंद्रदर्शन, संक्रमण पुण्यकाळ सकाळी ८.१५ पासून सायंकाळी ४.१५ पर्यंत, भारतीय सौर पौष २४ शके १९४२. 

दिनविशेष
१८८२ : समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचा जन्म. भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे ते चिरंजीव.
१८९२  : क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म. १९६५ मध्ये केंद्र सरकारतर्फे त्यांना ‘पद्मश्री’ आणि १९९१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताबाने सन्मानित करण्यात आले.
१८९६ : भारताचे अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांचा जन्म. रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
१९९८ : ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना  ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान जाहीर.
२००० : ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा ऊर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.

---------------------------------------------

दिनमान
मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक संधी लाभेल.
वृषभ : मानसिक अस्वस्थता कमी होईल. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. दगदग जाणवेल.
कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : कर्मचारीवर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
कन्या : संततीसौख्य लाभेल. अपेक्षित पत्रव्यवहार व गाठीभेटी होतील.
तूळ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.
वृश्‍चिक : काहींना गुरुकृपा लाभेल. आरोग्य चांगले राहील.
धनू : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. 
मकर : आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
मीन : थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीच्या कामात यश लाभेल.
प्रा. रमणलाल शहा

---------------------------------------------

loading image