esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १४ जुलै
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
मंगळवार - आषाढ कृ. ९, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १२.५५, चंद्रास्त दु. १.४६, भारतीय सौर २३, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १४ जुलै

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - आषाढ कृ. ९, चंद्रनक्षत्र अश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.०८, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. १२.५५, चंद्रास्त दु. १.४६, भारतीय सौर २३, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८५६ - समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म. ‘केसरी’चे पहिले संपादक, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून ते गाजले.
१९२० - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे गुणविशेष त्यांच्यामध्ये प्रकर्षाने दिसतात.
१९९३ - करवीर संस्थानच्या महाराणी, माजी खासदार श्रीमंत विजयमाला राणीसाहेब यांचे निधन.
२००३ - शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू के.भोगिशयना यांचे निधन. 
२००३ - भारताचा बुद्धिबळपटू संदीपन चंदा याने ग्रॅंडमास्टर किताब मिळविला आहे. हा किताब मिळविणारा तो भारताचा नववा खेळाडू ठरला आहे.

दिनमान -
मेष : खर्च वाढतील. उत्साह व उमेद वाढेल. कलेच्या क्षेत्रात यश लाभेल.
वृषभ : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्‍यता. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मिथुन : तुमचे निर्णय अचूक येतील. व्यवसायात अडचणी येण्याची शक्‍यता आहे.
कर्क : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगले यश लाभेल.
सिंह : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीला चांगला. विरोधकावर मात कराल.
कन्या : मित्रांच्या आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती.
तुळ : उत्साह व उमेद वाढेल. व्यवसायात प्रगती होईल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
वृश्‍चिक : प्रवास शक्‍यतो पुढे ढकलावेत. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
मकर : व्यवसायात तुमचे निर्णय अचूक ठरतील. व्यवसाय वाढेल.
कुंभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात विशेष यश लाभेल.
मीन : सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. एखादी चांगली घटना घडेल.

Edited By - Prashant Patil