esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर

पंचांग -
बुधवार - अधिक आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय पहाटे ४.४३, चंद्रास्त दुपारी ४.३८, प्रदोष, भारतीय सौर २२ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
बुधवार - अधिक आश्विन कृष्ण १२, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.११, चंद्रोदय पहाटे ४.४३, चंद्रास्त दुपारी ४.३८, प्रदोष, भारतीय सौर २२ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक निशाण दिन 

१९३६ - प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुभाष भेंडे यांचा जन्म. डॉ. भेंडे यांनी कादंबरी, विनोद, नाटक, प्रवासकथा, बालवाङ्मय, अनुवाद आदी साहित्याच्या विविध दालनांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. 
१९४७ - केसरीचे संपादक, कायदेमंडळाचे सभासद साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचे निधन. त्यांनी इतिहास, कादंबरी, वैचारिक लेखन, कविता, नाटक, संपादकीय लेखन अशा विविध स्वरुपाचे विपुल लेखन केल्याने त्यांना ‘साहित्य सम्राट’ म्हणत.
१९५३ - समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांचे निधन. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते ज्येष्ठ पुत्र.
१९९३ - ज्येष्ठ उद्योगपती व वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष लालचंद हिराचंद यांचे निधन.

दिनमान -
मेष :
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. सुसंवाद साधाल. 
वृषभ : तुमची मते इतरांना पटवून द्याल. कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.
मिथुन : प्रवास सुखकर होतील. थोरामोठ्यांचे परिचय होतील.मानसन्मानाचे योग येतील.
कर्क : कौटुंबिक जीवनात स्वास्थ्य लाभेल. अचानक धनलाभाची शक्यता आहे.
सिंह : आपली मते इतरांना पटवून द्याल. आर्थिक क्षेत्रात विशेष प्रगती होईल.
कन्या : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. सुसंवाद साधाल.
तुळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. नवनवीन ओळखी होतील.
वृश्‍चिक : मनोबल उत्तम राहील. सार्वजनिक कामात यश लाभेल. कामे मार्गी लागतील.
धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. निर्णय योग्य ठरतील. सुयश लाभेल.
मकर : मानसिक अस्वस्थता जाणवेल. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
कुंभ : जोडीदाराबरोबर सुसंवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील.
मीन : मनोबल कमी राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil