esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 11 सप्टेंबर 2021

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : भाद्रपद शुद्ध ८, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्चिक/धनू, चंद्रोदय दुपारी १.२७, चंद्रास्त रात्री १२.४१, दुर्गाष्टमी, ज्येष्ठागौरी विसर्जन ७.०५ नं., भागवत सप्ताहारंभ, दोरक धारण, महर्षी दधीची जयंती, भारतीय सौर भाद्रपद २३ शके १९४३.

दिनविशेष -

हिंदी दिन

१९४९ : देवनागरी लिपीतील हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घटना समितीची मान्यता.

१९९५ : संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

१९९८ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.

दिनमान -

मेष : आर्थिक लाभ होतील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मिथुन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कर्क : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

सिंह : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : हितशत्रूंवर मात कराल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृश्‍चिक : अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

धनू : कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आर्थिक लाभ होतील.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

loading image
go to top