आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 15 ऑगस्ट

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

पंचांग -
शनिवार - श्रावण कृ. 11, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.02, अजा एकादशी, चंद्रोदय रा.2.16, चंद्रास्त दु.4.01, भारतीय सौर 23, शके 1942.

पंचांग -
शनिवार - श्रावण कृ. 11, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.18, सूर्यास्त 7.02, अजा एकादशी, चंद्रोदय रा.2.16, चंद्रास्त दु.4.01, भारतीय सौर 23, शके 1942. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७६९ - फ्रान्समधील पराक्रमी वीरपुरुष नेपोलियन बोनापार्ट यांचा जन्म. 
१८६७ - मराठी रंगभूमीवरील गेल्या शतकातील नामवंत नट  गणपतराव जोशी यांचा जन्म. त्यांची हॅम्लेटची भूमिका अतिशय गाजली होती.
१९१२ - पॅसिफिक व अटलांटिक महासागर जोडणारा पनामा कालवा सुरू झाला.
१९४७ - ब्रिटिश राजवट संपून ‘भारत’ स्वतंत्र झाला. देशाची फाळणी झाली. पश्‍चिम पंजाब, सिंध, बलुचिस्तान, वायव्य सरहद्द प्रांत, पूर्व बंगाल हे पाकिस्तानात समाविष्ट झालेले प्रदेश वगळता देशाचा उर्वरित प्रदेश (संस्थाने वगळून) स्वतंत्र भारत म्हणून अस्तित्वात आला. पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले.
१९५५ - गोवा मुक्तीसाठी पाच हजार लोकांचा सत्याग्रह. पोर्तुगिजांच्या गोळीबारात २८ ठार ८० जखमी.
१९९४ - तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खाँ यांचे निधन.
१९९७ - शांतता काळातील अतुलनीय शौर्याबद्दलचा ‘अशोकचक्र’ हा सर्वोच्च सन्मान सेकंड लेफ्टनंट पुनीत दत्त यांना मरणोत्तर जाहीर. 
१९९७ - दीडशे वर्षांच्या गुलामगिरीच्या जोखडातून देश मुक्त झालेल्या क्षणाचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना दीपावलीच्या तेजोमय सणाचा लखलखता दिमाखही जणू फिका ठरावा, अशा उत्सवी वातावरणात भारतीयांनी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा केला.
२००० - फाय पुरस्काराने गौरविलेले ज्येष्ठ लघुउद्योजक बाबुराव आरवाडे यांचे कोल्हापूर येथे निधन.
२००० - पुणे येथील मनोहर संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि जुन्या पिढीतील प्रसिद्ध गायिका लीलाताई सरदेसाई यांचे निधन.

दिनमान -
मेष :
सामाजिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग येतील. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. 
वृषभ : अंदाज अचूक येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. 
कर्क  : तुमच्या क्षेत्रात अधिकार प्राप्त होतील. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. 
सिंह : वाहने चालवताना काळजी घ्यावी. अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक क्षेत्रात नुकसानीची शक्‍यता आहे.
तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. विरोधकांवर मात कराल. उसनवारी वसूल होईल.
वृश्‍चिक : मानसिक अस्वस्थता जाणवेल. उधारी, उसनवारी वसूल होईल.
धनू : वादविवाद टाळावेत. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आजचा दिवस प्रतिकूल आहे. मुलामुलींसाठी खर्च कराल.
कुंभ : तुमच्या क्षेत्रात अधिकार योग येतील.अचानक लाभाची शक्‍यता आहे.
मीन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने चालवताना काळजी घ्यावी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 15th August 2020