esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 डिसेंबर

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध १, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ७.३४, चंद्रास्त सायंकाळी ६.४६, देवदीपवाली, मार्तंड भैरव षड्रात्रोत्सवारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार : मार्गशीर्ष शुद्ध १, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय ७ सूर्यास्त ५.५९, चंद्रोदय सकाळी ७.३४, चंद्रास्त सायंकाळी ६.४६, देवदीपवाली, मार्तंड भैरव षड्रात्रोत्सवारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९५० :  पोलादी पुरुष म्हणून ओळखले जाणारे स्वतंत्र भारताचे गृहमंत्री व उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. त्यांना १९९१ साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९९१ : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना चित्रपटक्षेत्रातील असाधारण कामगिरीसाठी  ‘खास ऑस्कर’ पारितोषिक जाहीर.
१९९८ : बॅंकॉक  येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक.

दिनमान -
मेष :
आरोग्य चांगले राहणार आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी पडतील.
वृषभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कौटुंबिक जीवनात वेळ देवू शकाल.
मिथुन : महत्त्वाची कामेमार्गी लागतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
कर्क : काहींची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. विरोधकांवर मात कराल.
सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
कन्या : प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक :  उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
धनु : आरोग्य उत्तमे राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.  वादविवाद टाळावेत.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्‍यतो टाळावेत. वरिष्ठांची कृपा लाभेल.
कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. संततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
मीन : मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

Edited By - Prashant Patil

loading image