esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 सप्टेंबर 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 15 सप्टेंबर 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय दुपारी २.२९, चंद्रास्त रात्री १.४१, सूर्योदय ६.२३, सूर्यास्त ६.३५, अदुःख नवमी, पारशी आर्दिबेहस्त मासारंभ, भारतीय सौर भाद्रपद २४ शके १९४३.

दिनविशेष -

राष्ट्रीय अभियंता दिन

१८६१ - भारतातील औद्योगिक युगाचे एक शतायुषी प्रवर्तक सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म. हा दिन ‘अभियंता दिन’ म्हणून पाळण्यात येतो. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. पुण्याची भुयारी गटार योजना, खडकवासला धरण, भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे, म्हैसूरचे कृष्णराजसागर धरण या कामांत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांना भारतरत्न हा सन्मान दिला गेला.

१८७६ - बंगाली कादंबरीकार, कथाकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. ‘पथेर दाबी’ या त्यांच्या कादंबरीतील क्रांतिकारक विचारांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांतही खळबळ उडवून दिली. ‘भारती’ या नावाने तिचे पु. बा. कुलकर्णी यांनी मराठीत भाषांतर केले आहे.

२००४ - भारतीय क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कारासाठी लांब उडीतील खेळाडू अंजू जॉर्जची निवड.

दिनमान -

मेष : नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. उत्साह, उमेद वाढेल.अनुकूलता लाभेल.

वृषभ : काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. अनुकूलता लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात वाढ करू शकाल.

तूळ : उधारी, उसनवारी वसूल होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनू : विरोधकांवर मात कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : वाहने सावकाश चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : काहींना प्रवासाचे योग येतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

loading image
go to top