आजचे राशिभविष्य आणि पंचांग - १६ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

पंचांग -
मंगळवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री १०.३३, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.००, वसंत पंचमी, श्री पंचमी, रति व कामदेव पूजन, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ २६ शके १९४२.

पंचांग -
मंगळवार : माघ शुद्ध ५, चंद्रनक्षत्र रेवती, चंद्रराशी मीन/मेष, चंद्रोदय सकाळी ९.५९, चंद्रास्त रात्री १०.३३, सूर्योदय ६.५९, सूर्यास्त ६.००, वसंत पंचमी, श्री पंचमी, रति व कामदेव पूजन, शांतादुर्गा रथोत्सव, भारतीय सौर माघ २६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१७४५ : मराठेशाहीतील कर्तबगार पेशवे थोरले माधवराव यांचा जन्म. पानिपतच्या युद्धानंतर विस्कटलेली मराठेशाहीची घडी त्यांनी बसविली.
१९४४ : भारतीय चित्रपटउद्योगाचे जनक धुंडिराज गोविंद ऊर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन.
१९५६ : प्रसिद्ध भारतीय वैज्ञानिक, संसद सदस्य डॉ. मेघनाद साहा यांचे निधन.
१९६८ : शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांच्या मालकीचा शेतकऱ्यांनी चालवलेला देशातील पहिला साखर कारखाना सुरू करणारे, सहकाराच्या कल्पनेचे उद्‌गाते कृषीशिरोमणी रावबहादूर नारायणराव सोपानराव बोरावके यांचे निधन.
१९९६ : थरमॅक्‍स उद्योगसमूहाचे अध्यक्ष आर. डी. आगा यांचे निधन. 
२००१ : ‘पिंजरा’, ‘सवाल माझा ऐका’, ‘केला इशारा जाता जाता’ आदी गाजलेल्या मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक रंजन साळवी यांचे निधन.

दिनमान -
मेष :
प्रवास शक्‍यतो टाळावेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.
वृषभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील. 
मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासात काळजी घ्यावी. कामात सुयश लाभेल.
कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. वैवाहिक सौख्य लाभेल.
तुळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्‍चिक : गाठीभेटी होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मकर : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.
मीन : तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामात सुयश लाभेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 16th February 2021