esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 नोव्हेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग- सोमवार : कार्तिक शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ७.०८, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, विक्रम संवत २०७७, अभ्यंगस्नान, वहीपूजन, यमद्वितीया, (भाऊबीज), पतीस ओवाळणे, परिधावीनाम संवत्सर, महावीर जैन संवत २५४७, चंद्रदर्शन, कार्तिक मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २५ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 नोव्हेंबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग-


सोमवार : कार्तिक शुद्ध १/२, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.४३, सूर्यास्त ५.५५, चंद्रोदय सकाळी ७.१७, चंद्रास्त सायंकाळी ७.०८, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा, विक्रम संवत २०७७, अभ्यंगस्नान, वहीपूजन, यमद्वितीया, (भाऊबीज), पतीस ओवाळणे, परिधावीनाम संवत्सर, महावीर जैन संवत २५४७, चंद्रदर्शन, कार्तिक मासारंभ, भारतीय सौर कार्तिक २५ शके १९४२.

आजचे दिनमान


मेष - कोणाच्याही आश्‍वासनांवर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृषभ - वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद साधाल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
मिथुन - हाताखालील व्यक्‍तींचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
कर्क - मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
सिंह - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. शासकीय क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस चांगला आहे.
कन्या - अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.
तुळ - आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्‍चिक - थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आजचा दिवस आनंदी आहे.
धनु - आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर - बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.
कुंभ - शासकीय कामे मार्गी लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.
मीन - काहींना नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.


दिनविशेष - 


आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन (युनेस्को)

1852 : शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल जोतिबा फुले यांचा ईस्ट इंडिया कंपनी सरकारतर्फे विश्रामबागवाड्यात मोठा सत्कार करण्यात आला. त्या वेळी प्राचार्य थॉमस कॅंडी यांच्या हस्ते त्यांना मानाची दोनशे रुपयांची शालजोडी देण्यात आली.
1877 : भारतीय अभियंते अर्देशिर वाडिया यांचे निधन. रॉयल सोसायटी ऑफ लंडन या मान्यवर आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्य म्हणजे एफआरएस झालेले ते पहिले भारतीय संशोधक होत. भारतात यांत्रिक नौकानयनाचा पाया त्यांनी घातला.
1883 : नामवंत हिंदी पत्रकार बाबूराव विष्णू पराडकर यांचा जन्म. "हितवार्ता' या हिंदी साप्ताहिकामध्ये राजकीय विषयावर गंभीर स्वरूपाचे टीकालेखन करून त्यांनी हिंदी पत्रसृष्टीत नवीन परंपरा सुरू केली.
1927 : "नटसम्राट', "हिमालयाची सावली', "किरवंत' पासून अगदी "क्षितिजापर्यंत समुद्र' या नाटकापर्यंत प्रभावी चरित्र भूमिकांनी मराठी रंगभूमी गाजविणारे ज्येष्ठ रंगकर्मी, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.
1942 : भारतात दूरसंचारसेवांचा विस्तार करण्यास कारणीभूत झालेले सॅम पित्रोदा यांचा जन्म.
1970 : "ल्यूनोखोद' हे ल्यूना-14 अग्निबाणावरून प्रक्षेपित रशियन मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरले.
1994 : दीर्घकाळ मैदान गाजविणारी नामवंत टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवा टेनिसमधून निवृत्त.
1996 : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी - मुंबई मार्गाचा शुभारंभ.
1996 : "पर्सन ऑफ प्राईड' या चतुरंग प्रतिष्ठान संस्थेच्या पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड.
1997 : अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील प्रसिद्ध ब्रॅंडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्‍टरेट प्रदान.
1997 : राज्यपाल पी. सी. अलेक्‍झांडर यांच्या हस्ते ख्यातनाम चित्रकार एम. एफ. हुसेन यांना "आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर' पुरस्कार प्रदान.
2000 : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचा "महाकवी कालिदास संस्कृत रचना पुरस्कार' डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर.
2002 : प्रख्यात तबलावादक लालजी रघुनाथ गोखले यांचे निधन. रोशनआरा बेगम, वझेबुवा, बडे गुलाम अली खॉं, आमीर खॉं, पलुस्करबुवा, विनायकबुवा पटवर्धन, भीमसेन जोशी, मल्लिकार्जून मन्सूर, सवाई गंधर्व, बालगंधर्व आदी 91 कलावंतांना त्यांनी साथ केली होती.
2004 : अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रिपदावर कोंडोलिसा राईस यांची नियुक्ती. अमेरिकेचे सध्याचे परराष्ट्र धोरण निश्‍चित करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.