esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार : अधिक आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, दर्श अमावास्या (अमावास्या समाप्ती रात्री १.०१), मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास समाप्ती, अन्वाधान, भारतीय सौर आश्विन २४ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 16 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : अधिक आश्विन कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.१०, दर्श अमावास्या (अमावास्या समाप्ती रात्री १.०१), मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास समाप्ती, अन्वाधान, भारतीय सौर आश्विन २४ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
जागतिक अन्नदिन 

१९४८ - अभिनेत्री, कुशल नृत्यांगना, चित्रपट-टीव्ही मालिकांची निर्माती-दिग्दर्शिका, राज्यसभेची सदस्य हेमामालिनी यांचा जन्म.  त्यांना १९९९ मध्ये भारत सरकारने ‘पद्मभूषण‘ पुरस्कार देऊन गौरविले.
१९४८ - नगरपालिकांच्या कारभारावरील टीकेमुळे गाजलेल्या ‘म्युनिसिपालिटी’ या नाटकाचे लेखक माधवराव जोशी यांचे निधन.
१९५० - पुणे अनाथ विद्यार्थी गृहाचे संस्थापक दादासाहेब केतकर यांचे निधन.
१९९७ - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस.डिव्होट्टा यांना अमेरिकेतील पर्यावरण संरक्षण संस्थेचा ‘स्ट्रेटोस्पिअर ओझोन प्रोटेक्‍शन ॲवॉर्ड’ हा पुरस्कार जाहीर.
२००२ - ज्येष्ठ कादंबरीकार ना.सं.इनामदार यांचे निधन. ‘झेप’, ‘मंत्रावेगळा’, ‘राऊ’ या कादंबऱ्यांसाठी रसिकांकडून मान्यता मिळाली. नगर येथे झालेल्या सत्तराव्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

दिनमान -
मेष :
मानसिक अस्वस्थता जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. गुरूकृपा लाभेल.
वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मिथुन : प्रॉपर्टीचे व्यवहार मार्गी लावू शकाल. नोकरी, व्यवसायात उत्तम प्रगती होईल.
कर्क : नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. काहींना व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : हितशत्रुंचा त्रास कमी होईल. प्रवासामध्ये काळजी घ्यावी. गाठीभेटी होतील.
वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. सुयश लाभेल.
धनु : नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
कुंभ : अचानक धनलाभाची शक्यता आहे. वादविवाद टाळावेत. सुसंवाद साधाल.
मीन : दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.कामे मार्गी लागतील.

Edited By - Prashant Patil