आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 16 सप्टेंबर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

पंचांग -
बुधवार - भाद्रपद कृ.14, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.36, चंद्रोदय प. 4.57, चंद्रास्त सायं. 6.08, भारतीय सौर 25, शके 1942.

पंचांग -
बुधवार - भाद्रपद कृ.14, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.36, चंद्रोदय प. 4.57, चंद्रास्त सायं. 6.08, भारतीय सौर 25, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष  -
जागतिक ओझोन संरक्षण दिन 

१७३६ - पाऱ्याचा वापर करून कार्यक्षम तापमापक तयार करणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गाब्रिएल डानिएल फॅरनहाइट यांचे निधन. शरीरातील तापमान मोजण्याची श्रेणी त्यांच्या नावाने ओळखली जाते. पाण्याचा उत्कलनबिंदू वातावरणीय दाबानुसार बदलतो, हे त्यांचे महत्त्वाचे शोध.
१९४२ - विख्यात निसर्ग कवी, प्रयोगशील शेतकरी, अभ्यासू आमदार ना. धों.महानोर यांचा जन्म.  ‘अजिंठा’, ‘वही’, ‘रानातल्या कविता’, ‘प्रार्थना दयाघना’, ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ हे कविता संग्रह, ‘गांधारी’ ही कादंबरी, पळसखेडची गाणी, गपसप या लोकसाहित्याचे संपादन, काही खंडकाव्ये प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी ‘जैत रे जैत’, ‘सर्जा’, ‘दोघी’, ‘एक होता विदूषक’ आदी चित्रपटांना दिलेली गाणी लोकप्रिय आहेत. 
१९६३ - मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
१९७३ - पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक आणि सार्वजनिक कार्यकर्ते गंगाधरराव नारायणराव ऊर्फ आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. १९३५ मध्ये बहुमानाचा ‘सी.आय.ई.’ किताब देण्यात आला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते २४ वर्षे चिटणीस होते. शास्त्रीय संगीतातील अनेक बंदिशी त्यांनी संग्रहित केल्या.

दिनमान -
मेष  : आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. 
वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे. शत्रुपिडा नाही.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती कराल. तुमच्या कर्तृत्व गुणांना वाव मिळेल. 
कर्क  : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
सिंह : वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. 
कन्या : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. प्रवास टाळावा. कामात अडथळे जाणवतील.
तूळ : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल.गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मकर  : कामाचा ताण व दगदग जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. 
कुंभ : महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. भागीदारी व्यवसायातून फायदा होईल.
मीन : मनोरंजनाकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. विनाकारण  पैसा वाया जाईल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Daily Horoscope and Panchang of 16th September 2020