esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१

रविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्योदय - ७.११ ,सूर्यास्त - ६.१८  भारतीय सौर पौष २६ शके १९४२. 

आजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्योदय - ७.११ ,सूर्यास्त - ६.१८  भारतीय सौर पौष २६ शके १९४२. 

----------------------------

दिनविशेष
१९०६ : कुटुंब नियोजनाच्या प्रचार कार्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या शकुंतला परांजपे यांचा जन्म.
२००० : आपल्या तडफदार गायनाने मराठी रंगभूमी ज्यांनी गाजविली अशा जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.
२००१ : अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील ‘सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
२००१ : मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा ‘कालिदास सन्मान’ कथक नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व गुरू रोहिणी भाटे यांना जाहीर.
२००२ : चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना ‘इनरव्हील डिस्ट्रिक्‍ट ३१४’ या संस्थेतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
२००३ : ज्येष्ठ उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते हरिहर दिनकर ऊर्फ भाऊसाहेब काळे यांचे निधन. आयात, निर्यात, विद्युत अवजारे, संगणक, शेती अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

----------------------------

दिनमान
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे निर्णय अभ्यास करून नंतरच घ्यावेत.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. व्यवसायात व नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : काहींना कौटुंबिक जीवनात सतत एखादी चिंता लागून राहील. 
सिंह : व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील.
कन्या : आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात काही नवीन प्रस्ताव समोर येतील. 
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.
मकर : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल.
मीन : वाहने चालवताना काळजी घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
प्रा. रमणलाल शहा

 

loading image