esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ७.०१ सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी ९.२९, चंद्रास्त रात्री ८.४९, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २६ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 17 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी मकर, सूर्योदय ७.०१ सूर्यास्त ६, चंद्रोदय सकाळी ९.२९, चंद्रास्त रात्री ८.४९, मु. जमादिलावल मासारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष २६ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९९९ : भविष्य निर्वाह निधी योजनेला ग्राहक संरक्षण कायदा लागू होत असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. 
१९९९ : ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर व ख्यातनाम नर्तक बिरजू महाराज यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीची सन्मानवृत्ती प्रदान.
२००० : ॲथलेटिक्‍सचे पितामह,नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला यांचे निधन.
२००० : समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचे गाढे अभ्यासक व भक्त नानासाहेब धर्माधिकारी यांना संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने ‘संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार’ प्रदान.
२००२ : पुणे येथील विषुववृत्तीय हवामानशास्त्र संस्थेतील (इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिरिऑलॉजी) शास्त्रज्ञ डॉ. जी. बेग यांना  ‘मास असोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट इन सायन्स’ या संस्थेचा यंदाचा राष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर.

दिनमान -
मेष :
प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वादविवाद टाळावेत.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
सिंह : हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : संततिसौख्य लाभेल. व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील.
तुळ : महत्त्वाची प्रॉपर्टीची व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. 
वृश्‍चिक :  हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल.
धनु : व्यवसायातील निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.
मकर : संततिसौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. कौटुंबिक चिंता लागून राहील.
मीन : संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

Edited By - Prashant Patil

loading image