esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 17 सप्टेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.30, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.35, सर्वपित्री अमावास्या, भारतीय सौर 26, शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 17 सप्टेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
गुरुवार - भाद्रपद कृ.30, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय 6.25, सूर्यास्त 6.35, सर्वपित्री अमावास्या, भारतीय सौर 26, शके 1942.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८८५ - प्रबोधनकार ठाकरे नावाने परिचित असलेले पत्रकार, समाजसुधारक, वक्ते केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म. समाजसुधारणेच्या आणि समतेच्या तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारिता, तसेच प्रभावी वक्तृत्व व इतिहास संशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होत. 
१९३८ - स्वातंत्र्योत्तर काळातील एक प्रभावी व प्रयोगशील मराठी कवी, कथाकार, समीक्षक व विचारवंत दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म. त्यांना ‘एकूण कविता-१’ या काव्यसंग्रहाबद्दल व ‘सेज तुका’ या संत तुकारामांच्या अभंगांच्या इंग्रजी अनुवादाबद्दल साहित्य अकादमीचे पुरस्कार एकाच वेळी देण्यात आले.
१९७५ - महाराष्ट्र बॅंकेचे संस्थापक आणि महाराष्ट्रात तांत्रिक शिक्षण वाढावे यासाठी प्रयत्न करणारे धोंडूमामा साठे यांचे निधन.
२००३ - भारताच्या मेजर राजवर्धनसिंग राठोडने सायप्रस (निकोशिया) येथे झालेल्या विश्‍वकरंडक शॉटगन स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले. दुहेरी ट्रॅप प्रकारात २०० पैकी १८९ गुणांची कमाई करुन तिसरे स्थान पटकाविले.

दिनमान -
मेष -
 दानधर्म कराल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल. 
वृषभ - मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल.   प्रियजनांचा सहवास लाभेल. 
मिथुन - प्रॉपर्टीची, गुंतवणुकीची कामे पूर्ण करू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. 
कर्क - नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. 
सिंह - काहींना अचानक धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. 
कन्या - अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. दैनंदिन  कामात सुयश लाभेल.  
तूळ - खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक कामात वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. 
वृश्‍चिक - मित्रमैत्रिणींशी सुसंवाद साधाल. प्रियजनांचा सहवास लाभेल. 
धनू - नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. 
मकर - दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील.  
कुंभ - महत्त्वाची कामे नकोत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत. 
मीन - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. प्रवासाचे योग येतील. मनोबल उत्तम राहील. 

Edited By - Prashant Patil