आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 ऑक्टोबर

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 18 ऑक्टोबर

पंचांग -
रविवार - निज आश्विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र स्वाती, चंद्रराशी तूळ/वृश्चिक, सूर्योदय ६.३०, सूर्यास्त ६.०८, चंद्रोदय सकाळी ७.५२, चंद्रास्त सायंकाळी ७.४०, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्विन २६ शके १९४२.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९०६ - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी ‘डिप्रेस्ड क्‍लासेस मिशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
१९०९ - देशभक्त व तडफदार नेते लालमोहन घोष यांचे निधन. १९०३ मध्ये मद्रासमध्ये भरलेल्या १९ व्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत त्यांनी भारताच्या विविध राजकीय हक्कांकरिता प्रचार केला. 
१९३१ - हिंदी कवी व पत्रकार श्रीकांत वर्मा यांचा जन्म. त्यांनी ‘दिनमान’ या प्रख्यात साप्ताहिकासाठी खास वार्ताहर म्हणून काम केले. १९७६ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली. त्यांनी विविध वाङ्मयप्रकार हाताळले परंतु त्यांची ख्याती मुख्यत- कवी म्हणूनच होती. त्यांची वीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
१९३१ - विजेचा दिवा, ग्रामोफोन वगैरे शोध लावणारे प्रसिद्ध संशोधक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन. २१ ऑक्‍टोबर १८७९ रोजी काचेच्या निर्वात फुग्यात ठेवलेल्या कार्बनयुक्त तंतूचा दिवा करण्यात त्यांना यश आले. एप्रिल १९२८ पर्यंत त्यांनी १०३३ पेटंट मिळविली होती.
१९५२ - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्याच क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा एक डाव ७० धावांनी विजय.
१९५६ - १८ वेळा ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद व ९ वेळा विंबल्डनचे विजेतेपद मिळविणारी  अनभिषिक्त सम्राज्ञी मार्टिना नवरातिलोव्हा यांचा जन्म.
१९९३ - भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या बालअभिनेत्री मंदाकिनी विश्वनाथ आठवले यांचे निधन. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या त्या कन्या होत.  


दिनमान -
मेष :
आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. प्रकृतीची अपेक्षित साथ लाभेल.
वृषभ : प्रवासात काळजी घेणे गरजेचे आहे. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
मिथुन : संततिसौख्य लाभेल. आरोग्य चांगले राहील. मानसन्मानाचे योग येतील.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : प्रवासाचे योग येतील. आर्थिक सुयश लाभेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
कन्या : तुमच्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
वृश्‍चिक : भागीदारी व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल. वादविवाद टाळावेत.
धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देवू शकाल.
मकर : आरोग्य उत्तम राहील. मान व प्रतिष्ठेचे योग येतील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.
कुंभ : अपेक्षित सुसंधी लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.सुसंवाद साधाल. 
मीन : वादविवाद टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.खर्चाचे प्रमाण वाढणार आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com