esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya_73.jpg

पंचांग - शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ७.०२ सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सकाळी ११.०६, चंद्रास्त रात्री १०.४३, नागपूजन-नागदिवे, भारतीय सौर मार्गशीर्ष २८ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 19 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

पंचांग -
शनिवार : मार्गशीर्ष शुद्ध ५, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ७.०२ सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सकाळी ११.०६, चंद्रास्त रात्री १०.४३, नागपूजन-नागदिवे, भारतीय सौर मार्गशीर्ष २८ शके १९४२.

दिनविशेष 

1852 - अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक आल्बर्ट मायकेलसन यांचा जन्म. वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी 1907 मध्ये नोबेल पुरस्कार प्राप्त.
1860 - ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा 1848 - 56 चा गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अँड्य्रू ब्राऊन रॅमझी डलहौसी यांचे निधन. रस्ते, पूल, इमारती बांधणी व देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करून सुमारे 3400 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले. ठाणे-मुंबई लोहमार्ग त्यांच्या कारकिर्दीत झाला. टपाल, तार यांची सोय त्यांनी केली.
1894 - दानशूर उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म. त्यांनी अशोक मिल्स, अरविंद मिल्स या कापड गिरण्या सुरू केल्या. आपल्या गिरण्यांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकारी संस्था काढल्या. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून त्यांनी 1957 ते 1961 पर्यंत काम केले.
1996 - ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि प्राग येथील ऍकॅडमी ऑफ सायन्सचे डॉ. जिरी ग्रिगार यांना विज्ञान प्रसारासाठीचा कलिंग पुरस्कार विभागून जाहीर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक विभागातर्फे (युनिसेफ) हा पुरस्कार दिला जातो.
1997 - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य- संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेंद्र बारलिंगे यांचे निधन.
1998 - बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गेले 32 वर्षे हुलकावणी देणारे हॉकीतील सुवर्णपदक धनराज पिल्लेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पटकावले.
1998 - प्रसिद्ध भावगीतगायक जनार्दन लक्ष्मण ऊर्फ जे. एल. रानडे यांचे निधन. त्यांच्या 80 ध्वनिमुद्रिका 1933 ते 1952 पर्यंत प्रसिद्ध झाल्या. 1936 मध्ये प्रसिद्ध झालेल्या "अति गोड गोड ललकारी' या गाण्याने त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या "चांद हसरा पुनवेचा...", "नभि हसली चंद्रिका चकोरा...', "किती बाई मधुर कलिका ही...' आदी ध्वनिमुद्रिका त्या काळात गाजल्या होत्या. आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर त्यांचे कार्यक्रम झाले.
1999 - प्रसिद्ध रणजी क्रिकेटपटू, कुशल संघटक हेमचंद्र ऊर्फ बाळ दाणी यांचे निधन. 24 वर्षे खेळाडू आणि तेवढीच म्हणजे 24 वर्षे निवड समिती सदस्य, व्यवस्थापक, किंवा प्रशिक्षक अशा दोन्ही "इनिंग्ज' त्यांनी विलक्षण तन्मयतेने रंगविल्या. रणजी स्पर्धेतील 15 शतके, पाच हजारांवर धावा आणि चारशेपेक्षा अधिक बळी ही कामगिरी त्यांचे अष्टपैलुत्व दाखविणारी आहे.

दिनमान -

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देणे गरजेचे भासेल.
वृषभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
कर्क : काहींना कौटुंबिक जीवनात एखादी चिंता लागून राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय पुढे ढकलावेत.
सिंह : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.
वृश्‍चिक : प्रॉपर्टी व गुंतवणुकीच्या संदर्भात नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
धनु : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत राहून यश मिळवाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मकर : जुनी येणी वसूल होतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
कुंभ : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.
मीन : प्रवासामध्ये वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
 

loading image