esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १९ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
शुक्रवार : ज्येष्ठ कृ. १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय प. ४.१३, चंद्रास्त सायं. ५.३९, भारतीय सौर २९, शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १९ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
शुक्रवार : ज्येष्ठ कृ. १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१४, चंद्रोदय प. ४.१३, चंद्रास्त सायं. ५.३९, भारतीय सौर २९, शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१६२३ - पहिल्या गणकयंत्राचे जनक असणारे फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ व धार्मिक तत्त्ववेत्ते ब्लेझ पास्कल यांचा जन्म. 
१८७७ - नामवंत शतायुषी कृषिशास्त्रज्ञ डॉ.पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात यांचा जन्म.  शेतीमध्ये डॉक्‍टरेट मिळविणारे , शेतकी महाविद्यालयाचे प्राचार्य होणारे आणि राज्याच्या शेती खात्याचे संचालक होणारे ते पहिले भारतीय अधिकारी होते.
१९४७ - ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकामुळे वादग्रस्त ठरलेले लेखक सलमान रश्‍दी यांचा जन्म.
१९७७ - झुल्फिकार अली भुट्टो यांचे सरकार उलथवून जनरल झिया उल हक यांनी पाकिस्तानातील सत्ता हाती घेतली.
१९८१ - ‘ॲपल’ हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला बहुउद्देशीय भारतीय भूस्थिर उपग्रह फ्रेंच गयानातील कोउरु अंतरिक्ष प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला.
१९९३ - नोबेल पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक सर विल्यम गोल्डिंग यांचे निधन.
१९९८ -  साहित्यिक, विनोदी लेखक  आणि ६४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश मंत्री यांचे निधन.
१९९९ - कलकत्ता आणि बांगलादेशाची राजधानी ढाका दरम्यान थेट बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्‌घाटन. 
२००३ - शांततेचा नोबेल पुरस्कार विजेत्या आणि म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यू की यांचा ५८ वा वाढदिवस बंदिवासात साजरा.

दिनमान -
मेष :
आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. 
वृषभ : गेले दोन दिवस असणारी प्रतिकूलता संपेल. कामात सुयश लाभेल.
मिथुन : काहींना निरुत्साहीपणा जाणवेल. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. 
कर्क  : अनेकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. 
सिंह  : दैनंदिन कामात सुयश लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.  
कन्या : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामातील अडचणी कमी होतील. 
तूळ : मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. 
वृश्‍चिक : तुमचे मनोबल उत्तम राहील. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपेल.
धनू : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अनावश्‍यक कामात वेळ वाया जाईल. 
मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. 
कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे मन आनंदी राहील. दैनंदिन कामात सुयश. 
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. भाग्यकारक घटना घडेल.