esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जून
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग
सोमवार - ज्येष्ठ शु. १०  चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०२.४० चंद्रास्त रा.०२.२५ भारतीय सौर ११,   शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ०१ जून

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग
सोमवार - ज्येष्ठ शु. १०  चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.०८, चंद्रोदय दु. ०२.४० चंद्रास्त रा.०२.२५ भारतीय सौर ११,   शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिनविशेष 

 • १८७२ - ‘चाफा बोलेना’ या कवितेमुळे लोकप्रिय झालेले कवी ‘बी’ यांचा जन्म. त्यांचे मूळ नाव नारायण मुरलीधर गुप्ते.
 • १९२९ - भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडविणारी महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मिती संस्था, मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ मानल्या जाणाऱ्या ‘प्रभात फिल्म कंपनी‘ची कोल्हापूर येथे स्थापना.
 • १९३४ - ‘बहु असोत सुंदर संपन्न...’ या प्रसिद्ध महाराष्ट्र गीताचे जनक, नाटककार, वाङ्‌मयसमीक्षक व विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन. ‘सुदाम्याचे पोहे अर्थात अठरा धान्यांचे कडबोळे’ हा त्यांच्या विनोदी लेखांचा संग्रह हा मराठीचा बहुमोल वाङ्मयठेवा आहे. ‘भारतीय ज्योतिर्गणित’ या ग्रंथातून ज्योतिर्गणितविषयक व्यासंग प्रतीत होतो.
 • १९३८ - नृत्यातील नैपुण्याने व ठसकेबाज अभिनयाने मराठी चित्रपट, नाट्यसृष्टीवर अधिराज्य गाजविलेल्या अभिनेत्री लीला गांधी यांचा जन्म. त्यांचे ‘केला इशारा जाता जाता’, ‘पैज’, ‘गोरा कुंभार’, ‘सुशीला’ हे चित्रपट गाजले होते.
 • १९९८ - ज्येष्ठ साहित्यिक व दुर्गप्रेमी गो. नी. दांडेकर यांचे निधन.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


दिनमान

 • मेष : व्यवसायात उत्तम स्थिती. कामे मार्गी लागतील.आर्थिक लाभ होतील.
 • वृषभ : आरोग्य चांगले राहील. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
 • मिथुन : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.
 • कर्क : मनोबल वाढेल. लोकांचे सहकार्य मिळेल.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
 • सिंह  : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
 • कन्या : उत्साह व उमेद वाढेल. आरोग्य उत्तम राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
 • तुळ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
 • वृश्‍चिक  : कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
 • धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
 • मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. कलेच्या क्षेत्रात यश मिळेल.
 • कुंभ  : आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. हितशत्रुंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे.
 • मीन : तुमचे निर्णय अचूक ठरतील. मुलामुलींची प्रगती होईल.