आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २ फेब्रुवारी २०२१

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 February 2021

मंगळवार : पौष कृष्ण ५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०.५८, चंद्रास्त सकाळी १०.३०, सूर्योदय - ७.०८, सूर्यास्त - ६.२७, भारतीय सौर माघ १२ शके १९४२. 

मंगळवार : पौष कृष्ण ५, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय रात्री १०.५८, चंद्रास्त सकाळी १०.३०, सूर्योदय - ७.०८, सूर्यास्त - ६.२७, भारतीय सौर माघ १२ शके १९४२. 

दिनविशेष
१८८४ : महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म. एकट्याच्या हिमतीवर ज्ञानकोशासारखी कामे पूर्ण करण्याची परंपरा त्यांच्यापासून सुरू झाली.
१९५३ : अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना.
१९१७ : लोकमान्य टिळकांचे गुरुतुल्य स्नेही, विख्यात वैद्य महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांचे निधन. ते एकाच वेळी कायदा आणि वैद्यक परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९५७ - नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातून तुरुंगातून मुक्तता. तुरुंगवासात नानासाहेबांनी ‘अमेरिकन संघराज्याचा इतिहास’ हा ग्रंथ लिहिला.
२००० : १९५१ च्या दिल्ली आशियाई फुटबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्या भारतीय संघातील खेळाडू अब्दुल लतीफ यांचे निधन.
२००४ : दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील अटलांटिक महासागरात १८ किलोमीटरचे अंतर पोहून जाणारा जगातला सर्वांत लहान वयाचा जलतरणपटू बनण्याचा मान १० वर्षे ५ महिने वयाच्या आदित्य राऊत या पुण्याच्या मुलाने मिळवला आहे.

दिनमान
मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शारीरिक दगदग जाणवेल.
वृषभ : आर्थिक सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
मिथुन : कौटुंबिक सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल.
कर्क : काहींना प्रवासाचे योग येतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : आत्मविश्‍वासाने कार्यरत रहाल. गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे.
कन्या : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल.
तूळ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे लांबण्याची शक्‍यता आहे.
वृश्‍चिक  : संततिसौख्य लाभेल. मुलामुलींच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल.
धनू : व्यवसायात प्रगतीचे वातावरण राहील. काही नवीन प्रस्ताव समोर येतील.
मकर : काहींना अपेक्षेप्रमाणे संधी प्राप्त होईल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : मुलामुलींच्या प्रगतीसाठी खर्च होईल. प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.
मीन : रखडलेली कामे मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात सुसंधी साधू शकाल.
- प्रा. रमणलाल शहा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daily horoscope and panchang 2 feb 2021