esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 डिसेंबर
sakal

बोलून बातमी शोधा

Bhavishya

पंचांग -
रविवार - मार्गशीर्ष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री ११.३५, चंपाषष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन, स्कंदषष्ठी, भारतीय सौर मार्गशीर्ष २९ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 डिसेंबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
रविवार - मार्गशीर्ष शुद्ध ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०१, चंद्रोदय सकाळी ११.४६, चंद्रास्त रात्री ११.३५, चंपाषष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन, स्कंदषष्ठी, भारतीय सौर मार्गशीर्ष २९ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९३३ - सुधारणावादी विचारांचे, अनेक संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद करणारे विद्वान विष्णुशास्त्री बापट यांचे निधन.
१९४० - नर्तिका यामिनी कृष्णमूर्ती यांचा जन्म. दिल्ली येथे त्यांनी ‘कौस्तुभ’ या नृत्यशाळेची  स्थापना केली. १९६७ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ सन्मान प्रदान करण्यात आला.
१९५६ - थोर संत व समाजसुधारक गाडगेमहाराज यांचे निधन. मूळ नाव डेबूजी. कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले.
१९९३ - आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार वामन नारायण ऊर्फ डब्ल्यू. एन. भट यांचे निधन.
२००४ - माजी पोलिस अधीक्षक व पोलिस चातुर्यकथा लेखक व. कृ. ऊर्फ वसंत कृष्ण जोशी यांचे निधन. गुन्हेगारांच्या केवळ शाब्दिक वर्णनावरून रेखाचित्र करण्याच्या ‘आयडेंटिटी किट’ या अमेरिकन तंत्रात पारंगतता मिळवणारे व. कृ. जोशी हे भारतातील पहिले पोलिस अधिकारी होते.

दिनमान -
मेष :
महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील. काहींना गुप्त वार्ता समजेल.
वृषभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. वरिष्ठांची कृपा लाभेल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना दक्षता घ्यावी. संततिसौख्य लाभेल.
सिंह : आपली मते इतरांना पटवून द्याल. वैवाहिक सौख्य लाभेल.
कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हाता खालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
तुळ : संततीचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पूर्ण होतील.
वृश्‍चिक : अनावश्‍यक कामावर वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता. 
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : कौटुंबिक सौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
मीन : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

Edited By - Prashant Patil

loading image