esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 जुलै 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope and Astrology

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 20 जुलै 2021

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

मंगळवार : आषाढ शुद्ध ११, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्चिक, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय दुपारी ३.३५, चंद्रास्त रात्री २.५९, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१२, देवशयनी एकादशी, चातुर्मास्यारंभ, पंढरपूर यात्रा, पुनर्यात्रा, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४३.

दिनविशेष -

१९०८ - बडोद्याचे महाराज सयाजीराव महाराज यांच्या पुढाकाराने ‘बॅंक ऑफ बडोदा’ची स्थापना.

१९१९ - एव्हरेस्टवर पहिली यशस्वी चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक एडमंड हिलरी यांचा जन्म. त्यांनी रबरी होडीतून गंगेच्या मुखापासून गंगोत्रीपर्यंतचा प्रवास केला होता.

१९३७ - बिनतारी संदेशवहनाच्या विकासात महत्त्वाचे संशोधन करणारे इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांचे निधन. त्यांच्या संशोधनाबद्दल त्यांना १९०९ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते.

१९४३ - कादंबरीकार, साहित्य, समीक्षक आणि तत्त्वचिंतक वामन मल्हार जोशी यांचे निधन. ‘रागिणी अथवा काव्यशास्त्रविनोद’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीमुळे त्यांचे नाव सर्वतोमुखी झाले. त्यानंतर ‘आश्रमहरिणी’, ‘नलिनी’, ‘सुशीलेचा देव’ इ. कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या.

१९६९ - अमेरिकेच्या अपोलो-११ यानातून गेलेले नील आर्मस्ट्राँग व एडविन ऑल्ड्रिन या दोन अंतराळवीरांनी आपले चांद्रयान चंद्रावर उतरविले. यामुळे मानवाचे अनेक शतकांचे स्वप्न प्रत्यक्षात आले.

दिनमान -

मेष : मानसिक अस्वस्थता जाणवेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : वैवाहिक सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मिथुन : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : संततिसौख्य लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.

कन्या : हितशत्रुंवर मात कराल. नवीन परिचय होतील.

तुळ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना कामाचा ताण जाणवेल.

मकर : महत्त्वाचे पत्र व्यवहार व गाठीभेटी होतील. आर्थिक सुयश लाभेल.

कुंभ : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : गुरूकृपा लाभेल. कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

loading image